ग्रामीण भागातील समस्यांकडे अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:54+5:302014-12-20T22:27:54+5:30

प्रवासी निवारा दुरुस्त करण्याची मागणी

Ignore the problems in the rural areas | ग्रामीण भागातील समस्यांकडे अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

ग्रामीण भागातील समस्यांकडे अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

रवासी निवारा दुरुस्त करण्याची मागणी
अडगाव खुर्द : आकोट तालुक्यातील अडगाव खुर्द फाट्यावरील प्रवासी निवार्‍याची अतिशय दुरवस्था झाली आहे. या प्रवासी निवार्‍यावरील टिनपत्रे तुटलेले आहेत, बसण्याची व्यवस्था नाही, आजुबाजूच्या भिंती पडल्या आहेत. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रवासी निवार्‍याची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत. (वार्ताहर)
..............

वन्य प्राण्यांचा हैदोस
अडगाव खुर्द : अडगाव खुर्द शिवारात वन्यप्राण्यांनी चांगलाच हैदोस घातला आहे. या परिसरातील शेतकर्‍यांनी रब्बी हंगामातील हरभरा, गहू आदी पिकांची पेरणी केली आहे; परंतु वन्य प्राणी पिकांची नासाडी करीत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. तरी संबंधित विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी अडगाव शिवारातील शेतकरी करीत आहेत. (वार्ताहर)
..............

Web Title: Ignore the problems in the rural areas