संघाच्या अजेंड्यासाठी सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष

By Admin | Updated: January 16, 2015 06:39 IST2015-01-16T05:18:37+5:302015-01-16T06:39:54+5:30

नरेंद्र मोदी यांचे सरकार हिंदुत्वाचा अजेंडा राबविताना अल्पसंख्याक समुदाय आणि सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप बसपाच्या सुप्रीमो मायावती यांनी केला

Ignorance of the common man for the team's agenda | संघाच्या अजेंड्यासाठी सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष

संघाच्या अजेंड्यासाठी सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष

लखनौ : नरेंद्र मोदी यांचे सरकार हिंदुत्वाचा अजेंडा राबविताना अल्पसंख्याक समुदाय आणि सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप बसपाच्या सुप्रीमो मायावती यांनी केला. हे सरकार आपली मुख्य संघटना म्हणजे रा. स्व. संघाचा अजेंडा राबवितानाच भांडवलवाद्यांना लाभ मिळवून देत आहे.
मोदींनी बुधवारी मकरसंक्रांतीनिमित्त केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या दिल्लीतील निवासस्थानी खिचडी- दही-चुरा या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. दिल्लीत विधानसभेच्या सर्व ७० जागा लढविणार असल्याची घोषणा मायावती यांनी गुरुवारी आपल्या ५९ व्या वाढदिवशी लखनौ येथे केली.
स्वप्न दाखवत दिशाभूल
भाजपा आता हा पक्ष दिल्लीवासीयांना आमिषे आणि स्वप्न दाखवत दिशाभूल करीत आहे. केंद्र सरकारने भांडवलवाद्यांच्या मालकीच्या खासगी कंपन्यांकडे महत्त्वाची कामे सोपविताना दलित, मागासवर्गीयांसाठी आरक्षण कोट्याची व्यवस्था केलेली नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Ignorance of the common man for the team's agenda