शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

"अध्यक्षपदासाठी राहुल गांधी तयार नसतील, तर पर्याय शोधावा लागेल" - शशी थरूर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 10:50 AM

"काँग्रेसला नवसंजीवनी आणि मजबूत नेतृत्वाची गरज आहे. नव्या नेतृत्वामुळे बदल स्पष्टपणे दिसून येतील. त्यामुळे पक्षालाही बळकटी मिळेल."

इडुक्की : काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्षाची गरज आहे. राहुल गांधी यांनी पक्षाचे नेतृत्व करावे, अशी आमची इच्छा आहे. मात्र, ते तयार नसतील तर पर्याय शाेधावा लागेल, असे परखड मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी व्यक्त केले आहे. (If Rahul Gandhi is not ready for the presidency, then we have to find an alternative says Shashi Tharoor)

इडुक्की जिल्ह्यातील थाेडुपुआ येथे आयाेजित एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बाेलताना त्यांनी ही भूमिका मांडली. ते म्हणाले की, साेनिया गांधी यांनी अनेक वर्षे पक्षाचे यशस्वीरीत्या नेतृत्व केले. त्यांनी पक्षाला बळकटी दिली. मात्र, त्यांनी स्वत: अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता नव्या अध्यक्षाची नेमणूक करणे आवश्यक आहे. माझ्यासारख्या जुन्या नेत्यांची ही मागणी लवकरच पूर्ण हाेईल, असा विश्वासही थरुर यांनी व्यक्त केला. 

शशी थरूर यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनीच पक्षाचे नेतृत्व करावे, अशी आमची सर्वांची इच्छा आहे. मात्र, ते इच्छुक नसतील तर आता आम्हाला पर्याय शाेधावा लागेल. पक्षाला पूर्णवेळ अध्यक्षाची गरज असून, या प्रक्रियेला आता गती मिळायला हवी, असे थरूर यांनी स्पष्टपणे सांगितले.

नेतृत्वाची गरज- काँग्रेसला नवसंजीवनी आणि मजबूत नेतृत्वाची गरज आहे. नव्या नेतृत्वामुळे बदल स्पष्टपणे दिसून येतील. त्यामुळे पक्षालाही बळकटी मिळेल, असे शशी थरूर म्हणाले. - काँग्रेसमध्ये पूर्णवेळ अध्यक्षाची गरज असून, वरपासून खालपर्यंत माेठे बदल करायला हवे, अशा मागणीचे पत्र गेल्या वर्षी साेनिया गांधी यांना पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी लिहिले हाेते. त्यात शशी थरूर यांचाही समावेश हाेता. थरूर यांनी हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस