शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

मोदींना मिठी मारता येते मग केजरीवालांना फोन का नाही? आपचा राहुल गांधींना प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 13:44 IST

अरविंद केजरीवाल यांच्या भूमिकेमुळे भारतीय जनता पार्टीला मदतच झाली आहे.

नवी दिल्ली- राज्यसभेत उपाध्यक्षांच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्त्वाखालील रालोआ सरकार एक परिक्षाच पास झाले आहे असे म्हणावे लागेल. या निवडणुकीत विरोधकांच्या होणाऱ्या एकजुटीमध्ये मात्र काही त्रूटी असल्याचे दिसून आले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी फोन केला नाही म्हणून आम आदमी पार्टीच्या सदस्यांनी अनुपस्थित राहाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सरकारला ही निवडणूक आणखी सोपी गेली.  राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठी मारु शकतात तर आमच्या पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना (मतदान करण्याची विनंती करणारा) फोन का करु शकत नाहीत?असा प्रश्न आपचे खासदार संजय सिंग यांनी विचारला आहे. आपला उमेदवार जिंकावा यासाठी नितिशकुमार प्रयत्न करतात तर काँग्रेसच्या उमेदवारासाठी राहुल का प्रयत्न करत नाहीत? आम्ही राष्ट्रपती, उपराष्ट्रपती निवडणुकीच्यावेळेस काँग्रेसची मदत केली मात्र साधे आभारही मानले गेले नाहीत अशी खंत संजय सिंग यांनी व्यक्त केली आहे.

 2014 साली केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे भारतीय जनता पार्टीला अनेकदा नामुष्कीजनक ठरावांना, दुरुस्त्यांना सामोरे जावे लागले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या ठरावातही विरोधकांनी मांडलेल्या दुरुस्त्यांना केवळ बहुमत नसल्यामुळे मान्य करावे लागले.  आता मात्र ही परिस्थिती बदलत आहे असे दिसून येते. राज्यसभेत भाजपाचे संख्याबळ वाढले असले तरी अनेक महत्त्वाच्या निर्णयांबाबतीत, ठरावांसाठी मित्रपक्षांना आणि कधीकधी विरोधकांनाही विनंती करावी लागते. उपाध्यक्षपदाची निवड एकमताने होण्याची चिन्हे मावळल्यावर भारतीय जनता पार्टीला मित्रपक्षांमधील उमेदवार शोधणे भाग पडले. बिजू जनता दलाला आपल्या गटात ओढण्यासाठी त्यांच्या सदस्यांपैकीही चाचपणी करुन झाली. तसेच अकाली दलाच्या गुजराल यांचे नाव पुढे करुनही त्यावर चर्चा करण्यात आली. शेवटी आता मित्रपक्षांमध्ये संबंध सर्वात जास्त ताणल्या गेलेल्या जनता दल युनायटेडच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब करण्यात आले.जदयु उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशी विनंती करणारा फोन पंतप्रधान मोदी यांनी बिजू जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनाईक यांना केला तर शेवटच्या दोन दिवसांमध्ये अकाली दल व शिवसेना यांचाही पाठिंबा त्यांनी मिळवला. सुरुवातीच्या काळामध्ये शिवसेना या मतदानामध्ये भाग घेणार नाही अशीही चर्चा होती.244 खासदारांच्या राज्यसभेत बहुमताचा आकडा 123 होता. मात्र सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे तो 119 वरती आला. केजरीवालांच्या आपसब वायएसआर काँग्रेस, मेहबूबा मुफ्ती यांचा पीडीपी पक्षाचे सदस्यही उपस्थित राहिले नाहीत.विरोधकांच्या गोटामध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, डावे पक्ष, सनाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, तेलगू देसम पक्ष यांचा समावेश होता.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टीRajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेस