शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

NDA चा पराभव झाला तर ट्रम्प प्रमाणे तेही...; लोकसभा निवडणुकीपूर्वी केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 09:51 IST

चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीत महापौरांसह सर्व पदांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आल्यानंतर आणि काँग्रेस-आप आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांची ही प्रतिक्रिया आली आहे.

चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपने गुंडगिरी आणि बेईमानी केली आहे. असा दिवस ‘लोकशाहीसाठी काळा दिवस आहे, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी मंगलवारी केला. एवढेच नाही तर, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत NDA चा पराभव झाला, तर ते (भाजप) ट्रम्प यांच्या प्रमाणे (अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प) खुर्ची सोडणार नाही. ते कुठल्याही थराला जाऊ शकतात, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. ते माध्यमांसोबत बोलत होते.

चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीत महापौरांसह सर्व पदांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आल्यानंतर आणि काँग्रेस-आप आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांची ही प्रतिक्रिया आली आहे. तसेच, चंदीगडच्या महापौर निवडणुकीत काय घडले, हे संपूर्ण देशाने बघितले, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. 

"हा लोकशाहीसाठी काळा दिवस" -अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा 2020 च्या राष्ट्रपीत पदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानतंरच्या घटनाक्रमाचा उल्लेख करत केजरीवाल म्हणाले, भाजपवाले लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यास कुठल्याही थराला जाऊ शकतात. तसेच, लोकशाहीसाठी हा काळा दिवस आहे. सर्वांनी पाहिले की, त्यांनी कशाप्रकारे मते चोरली आणि आपले उमेदवार जिंकूण आणले. मेअर कोण झाले हा मुद्दा नाही, पण देश आणि लोकशाही हारायला नको. मेअर येतात आणि जातात. पक्षही येतात आणि जातात.''

'AAP-Congress ला होतं स्पष्ट बहुमत' -केजरीवाल म्हणाले, जर लोकांनी एकत्रित येऊन ही  गुंडगिरी थांबली नाही, तर हे देशासाठी अत्यंत घातक ठरेल. आप-काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले होते आणि ही थेट निवडणूक होती. 8 मते अथवा एकूण मतांपैकी 25 टक्के मते अवैध ठरविण्यात आली. ही कुठल्या प्रकारची निवडणूक होती? महापौरपदाच्या निवडणूक निकालावरून समजते की, काहीतरी गडबड आहे. ते राष्ट्रीय पातळीवरच्या निवडणुकीतही कुठल्यही थराला जाऊ शकतात.

VIDEO केला शेअर - अरविंद केजरीवाल यांनी महापौर पदाशी संबंधित एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. एक्सवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बॅलेट पेपरवर स्वाक्षरी करताना दिसत आहे. साधारणपणे 6 मिनिटांच्या या व्हिडिओच्या माध्यमाने हा निवडणुकीत गडबड केल्याचा प्राकार असल्याचा आरोपही अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टीcongressकाँग्रेसBJPभाजपाNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी