तिरुवनंतपुरम : राजकारणात नसतो तर एरोस्पेस क्षेत्रात उद्योजक बनलो असतो, असे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी सांगितले. येथील टेक्नोपार्कमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिकांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.
सध्या केरळच्या दौऱ्यावर असलेले राहुल गांधी म्हणाले, मी राजकीय नेता असल्याचे अनेकांचे मत आहे. पण त्याहूनही बऱ्याच इतर गोष्टी मी करत असतो. मी राजकीय पक्षासाठी काम करत नसतो, तर एरोस्पेस क्षेत्रात उद्योजक बनलो असतो. मी पायलट आहे. माझे वडील, काकादेखील पायलट होते.
‘अमेरिकेच्या हाती भारताचा सर्व डेटा गेला’
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी आरोप केला की, अमेरिकेशी झालेल्या करारामुळे त्या देशाच्या हाती भारताचा सर्व डेटा गेला आहे. आमचा डेटा ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे अशी भूमिका केंद्र सरकारने घेण्याची आवश्यकता होती. अमेरिकेशी करार करून केंद्र सरकारने देशाला फसवले आहे. चीनने जगात एक उत्कृष्ट व अतुलनीय औद्योगिक प्रणाली निर्माण केली आहे. पण चीन लोकशाही नसलेला, बळजोरी करणारा आहे. भारत लोकशाही मूल्ये जपून उत्तम औद्योगिक प्रणाली विकसित करू शकेल, असा मला विश्वास वाटतो.
Web Summary : Rahul Gandhi stated he would have been an aerospace entrepreneur if not in politics. He criticized the government's data-sharing agreement with the US, alleging it compromises national data security. He believes India can develop a strong industrial system while upholding democratic values, unlike China.
Web Summary : राहुल गांधी ने कहा कि अगर राजनीति में नहीं होते तो एयरोस्पेस उद्यमी होते। उन्होंने अमेरिका के साथ सरकार के डेटा-साझाकरण समझौते की आलोचना करते हुए आरोप लगाया कि इससे राष्ट्रीय डेटा सुरक्षा खतरे में है। उनका मानना है कि भारत लोकतांत्रिक मूल्यों को बनाए रखते हुए एक मजबूत औद्योगिक प्रणाली विकसित कर सकता है, चीन की तरह नहीं।