शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

'भाजपाकडे फिल्म फ्रंचाइसी असती तर त्याचं नाव 'लाय हार्ड' असतं', राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 11:33 IST

ट्विट करून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

ठळक मुद्दे ट्विट करून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.  जर भाजपाकडे फिल्म फ्रंचाइसी असती तर त्याला 'लाय हार्ड' नाव दिलं असतं, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.

अहमदाबाद- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज (ता.23) गुजरातचा दौरा करणार असून राज्यातील पक्षाच्या नेत्यांची बैठक घेणार आहेत. तसंच राहुल गांधी ज्योतिर्लिंग सोमनाथ मंदिरातही जाणार आहेत. गुजरात दौऱ्याच्या आधी राहुल गांधी यांनी ट्विटवर क्रिएटीव्हीटी दाखविली आहे. ट्विट करून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

जर भाजपाकडे फिल्म फ्रंचाइसी असती तर त्याला 'लाय हार्ड' नाव दिलं असतं, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. भाजपावर नेहमीच सडकून टीका करणाऱ्या राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने भाजपावर टीका केलीये. सुत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी गुजरात दौऱ्याची सुरूवात सोमनाथ मंदिरापासून करणार आहेत. राहुल गांधी यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना विविध मंदिरांना भेट दिली होती. त्यामध्ये सोमनाथ मंदिराचाही समावेश होता. 

 

निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी यांच्या नावाची सोमनाथ मंदिरातील रजिस्टरमध्ये अहिंदू कॉलममध्ये नोंद केल्याने वाद निर्माण झाला होता. नंतर राहुल गांधींच्या नावाची नोंद काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली नसल्याचं पक्षाने स्पष्ट केलं होतं. गुजरात विधानसभा निवडणूक निकालात काँग्रेस बहुमताच्या आकड्यांपर्यंत पोहचू शकली नाही. पण काँग्रेसला गेल्या निवडणुकीपेक्षा 16 जागा जास्त मिळाल्या. तर भाजपा लागोपाठ सहावा विजय मिळविण्यात यशस्वी ठरली. पण गेल्या निवडणुकीपेक्षा भाजपाला कमी जागा मिळाल्या. 2012 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे 115 उमेदवार निवडणून आले. यावेळी भाजपाला 99 जागांवर समाधान मानावं लागलं.  

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस