शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

Kerala Assembly Election 2021: ...तर पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणू, ६० रुपये लीटर दरानं देऊ; भाजप नेत्याची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 13:42 IST

Kerala Assembly Election 2021: केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते कुम्मानम राजशेखरन यांचं आश्वासन

गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरांत सातत्यानं वाढ (Petrol Diesel Hike) सुरू आहे. देशातल्या काही शहरांत पेट्रोलच्या दरांनी शंभरी ओलांडली आहे. तर अनेक शहरांत पेट्रोलचा दर शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. पेट्रोल, डिझेलवरील आकारले जाणारे कर कमी करण्यात यावेत अशी मागणी सातत्यानं केली जात आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीची (Kerala Assembly Election 2021) रणधुमाळी सुरू असलेल्या केरळमधल्या भाजप नेत्यानं महत्त्वाचं आश्वासन दिलं आहे.आम्ही सत्तेत आल्यास पेट्रोल, डिझेलला वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंतर्गत आणून त्याची किंमत ६० रुपये लीटरच्या खाली आणू, असं आश्वासन भाजप नेते कुम्मानम राजशेखरन यांनी दिलं आहे. 'केरळमध्ये भाजपचं सरकार आल्यास आम्ही पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणू,' असं राजशेखरन कोच्चीतल्या पत्रकार परिषदेत म्हणाले. निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली.केरळमधलं एलडीएफ सरकार पेट्रोल, डिझेलला जीएसटीच्या अंतर्गत का येत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. इंधनावर कोणत्याही टप्प्यावर जीएसटी आकारता येणार नाही, असं विधान करणारे केरळचे मंत्री थॉमस आयझॅक यांचाही त्यांनी समाचार घेतला. 'जागतिक स्तरावर घडणाऱ्या घडामोडींमुळे इंधन दरांमध्ये बदल होत असतात भाजप सत्तेत आल्यास आम्ही इंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणू. त्यामुळे इंधन दर ६० रुपये प्रति लीटरच्या खाली येईल,' असं राजशेखरन यांनी सांगितलं. 

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढPetrolपेट्रोलDieselडिझेलGSTजीएसटीBJPभाजपा