'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 13:16 IST2025-09-26T13:14:14+5:302025-09-26T13:16:44+5:30

सोनम वांगचुक यांच्या विरोधात सीबीआयने चौकशी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईवर आता वांगचुक यांना प्रतिक्रिया दिली आहे.

If all the blame is put on me Sonam Wangchuk speaks out on foreign funding | 'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले

'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले

लडाखला सहाव्या अनुसूचीत समाविष्ट करण्यासाठी आणि राज्याचा दर्जा मिळावा यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागले. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला आणि ३० पोलिस आणि सीआरपीएफ जवानांसह ७० जण जखमी झाले. दरम्यान, आता सोनम वांगचुक यांच्या विरोधात सीबीआयने तपास सुरु केला असल्याची माहिती समोर आली आहे. यावर वांगचुक यांनी प्रतिक्रिया दिली.

सोनम वांगचुक सध्या हिंसाचार भडकवण्याच्या आरोपांमुळे चर्चेत आहेत. सोनम वांगचुक यांच्या एनजीओ, स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख (SECMOL) चा परकीय निधी परवाना रद्द करण्यात आला आहे. शिवाय, सीबीआयने सोनम वांगचुक यांच्याविरुद्ध चौकशी सुरू केल्याचे वृत्त आहे. "त्यांना लक्ष्य करण्यासाठी वेगळे केले जात आहे. राज्याच्या मागणीत सर्वात पुढे होतो आणि म्हणूनच मला लक्ष्य करण्यात आल्याचा दावा वांगचुक यांनी केला. 

आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं

निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत

"प्रत्येक गोष्टीसाठी मला जबाबदार धरले जात आहे. हिंसाचारानंतर दुसऱ्याच दिवशी गृह मंत्रालयाने एक प्रेस रिलीज जारी केली. माझे नाव अनेक वेळा घेतले आणि मला प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार धरण्यात आले, असा आरोप त्यांनी वांगचुक यांनी केला. यात माझी चूक नसल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या निवडणुकीदरम्यान दिलेल्या अपूर्ण आश्वासनांविरुद्ध लडाखचे लोक अजूनही निदर्शने करत आहेत. त्यावेळी लडाखला सहाव्या अनुसूचीत समाविष्ट करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आता लोकही तेच मागत आहेत. सरकारने ती मागणी पूर्ण करावी अशी या लोकांना इच्छा आहे, असेही सोनम वांगचुक म्हणाले. 

एवढेच नाही तर गेल्या दीड महिन्यांपासून त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरू असल्याचा आरोप वांगचुक यांनी केला."मला दीड महिन्यापूर्वी कळवण्यात आले होते की माझ्यावर देशद्रोहाचा खटला चालवला जाईल. शिवाय, मला माझ्या शाळेची जमीन परत घेण्याची नोटीस मिळाली. शिवाय, सीबीआयच्या पथकाने माझ्या जागेला भेट दिली आणि मला आयकर संदर्भात नोटीसही मिळाली. "माझ्या संस्थेला २०२२ ते २०२४ दरम्यान परदेशी निधी मिळाला का, अशी विचारणा करणारी नोटीस मला मिळाली, जरी माझ्याकडे परदेशी गुंतवणूक स्वीकारण्याचा परवाना नसला तरी. आमच्याकडे एफसीआरए परवाना नव्हता कारण आम्हाला परदेशी निधी नको आहे',असंही वांगचुक म्हणाले.

Web Title : सोनम वांगचुक ने लद्दाख अशांति के बीच विदेशी फंडिंग आरोपों पर स्पष्टीकरण दिया।

Web Summary : सोनम वांगचुक लद्दाख विरोध और हिंसा के बीच जांच का सामना कर रहे हैं। उन्होंने राज्य का दर्जा वकालत करने के लिए लक्षित होने का दावा किया। उनके एनजीओ का विदेशी धन लाइसेंस रद्द कर दिया गया, और एक सीबीआई जांच शुरू हुई। वांगचुक ने गलत काम करने से इनकार किया और सरकार पर अधूरे वादे करने का आरोप लगाया।

Web Title : Sonam Wangchuk clarifies allegations of foreign funding amidst Ladakh unrest.

Web Summary : Sonam Wangchuk faces scrutiny amid Ladakh protests and violence. He claims to be targeted for advocating statehood. His NGO's foreign funding license was revoked, and a CBI investigation started. Wangchuk denies wrongdoing and accuses the government of unfulfilled promises.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :ladakhलडाख