"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 15:03 IST2025-08-12T15:02:29+5:302025-08-12T15:03:21+5:30
अप्पलानायडू यांच्या घोषणेमुळे राज्यातही त्यांचे प्रचंड कौतुक झाले आहे. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनीही त्यांच्या या घोषणेचे कौतुक केले. महत्वाचे म्हणजे, नायडू यांनीही राज्यातील लोकसंख्या वाढवण्याचे आवाहन केले होते.

"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयनगरमचे टीडीपी खासदार अप्पलानायडू कालिसेट्टी यांचे जबरदस्त कौतुक केले आहे. अप्पलानायडू हे गेल्या वर्षी, तिसऱ्या अपत्यासाठी बक्षीस जाहीर करून प्रसिद्धीच्या झोतात आले होते. नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्यासोबत त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. यानंतर, पंतप्रधानांनी आपल्या कठोर परिश्रमाचे, समर्पणाचे आणि नवीन कल्पनांचे कौतुक केले, असे अप्पनलायडू यांनी म्हटले आहे.
कोण आहेत अप्पलानायडू कालिसेट्टी? -
कालिसेट्टी हे आंध्र प्रदेशातील विजयनगरम लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. ते त्यांच्या विधानांमुळे अनेकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी मार्च २०२५ मध्ये तिसऱ्या अपत्याच्या जन्मावर त्यांच्या पगारातून महिलांना गिफ्ट देण्याची घोषणा केली होती. जर तिसरा मुलगा झाला, तर एक गाय आणि तिसरी मुलगी झाली, तर आईला ५०,००० रुपये बक्षीस देण्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यांनी अनेक वेळा महिलांना दोनपेक्षा अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे.
अप्पलानायडू यांच्या घोषणेमुळे राज्यातही त्यांचे प्रचंड कौतुक झाले आहे. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनीही त्यांच्या या घोषणेचे कौतुक केले. महत्वाचे म्हणजे, नायडू यांनीही राज्यातील लोकसंख्या वाढवण्याचे आवाहन केले होते.
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले होते, दक्षिणेकडील राज्यांमध्ये कमी होणारी लोकसंख्या हा चिंतेचा विषय आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांची लोकसंख्या वाढत आहे. तिथे तरुणांची संख्याही अधिक आहे. अशा परिस्थितीत दक्षिणेतही लोकसंख्या वाढवण्याची गरज आहे. भाजपचा विचार करता, भाजपचे अनेक नेते लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात बोलताना दिसतात. टीडीपी हा केंद्रात एनडीएचा मित्रपक्ष आहे. तरीही, तो लोकसंख्या वाढवण्याच्या बाजूने आहे.