स्वतःवर गोळी झाडणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याची IAS पत्नी आली समोर; एफआयआर दाखल, कुणावर केले आरोप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 09:39 IST2025-10-09T09:38:32+5:302025-10-09T09:39:05+5:30

हरियाणातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार यांच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी, बुधवारी त्यांच्या पत्नीने उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

IAS wife of IPS officer who shot himself comes forward; FIR filed, who is accused? | स्वतःवर गोळी झाडणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याची IAS पत्नी आली समोर; एफआयआर दाखल, कुणावर केले आरोप?

स्वतःवर गोळी झाडणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याची IAS पत्नी आली समोर; एफआयआर दाखल, कुणावर केले आरोप?

हरियाणातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार यांच्या आत्महत्येने मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवारी चंदीगढमधील त्यांच्या निवासस्थानी ते मृतावस्थेत आढळले. त्यांनी स्वतःला गोळी मारून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी, बुधवारी त्यांच्या पत्नीने उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. 'हा सुनियोजित छळ होता, ज्यामुळे त्यांनी आत्महत्या केली,' असा दावा करत पत्नीने तक्रार दाखल केली असून, संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

'आत्महत्येला प्रवृत्त' केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

२००१च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या वाय. पूरन कुमार यांच्या पत्नी अमनीत पीकुमार यांनी चंदीगढ पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. त्यांनी रोहतक येथील एका वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अन्य एका उच्च अधिकाऱ्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ (आत्महत्येला प्रवृत्त करणे) आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायद्याच्या संबंधित कलमांखाली एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यांनी या अधिकाऱ्यांच्या त्वरित अटकेचीही मागणी केली आहे. अमनीत पीकुमार या सध्या मुख्यमंत्री नायब सैनी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासह जपानच्या अधिकृत दौऱ्यावर होत्या. ही बातमी मिळताच त्या परतल्या. 

आठ पानी 'सुसाइड नोट'मध्ये मानसिक छळाचा उल्लेख

या घटनेनंतर अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूरन कुमार यांनी कथितरित्या आठ पानांची लिखित आणि स्वाक्षरी केलेली 'सुसाइड नोट' लिहिली आहे. या पत्रात त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत आलेल्या अनेक समस्यांचा उल्लेख केला आहे. काही अधिकाऱ्यांकडून त्यांचा मानसिक छळ केला जात असल्यामुळे हे आत्मघाती पाऊल उचलण्यास भाग पडत असल्याचे, त्यांनी नोटमध्ये नमूद केले आहे.

रोखतालातील लाचखोरी प्रकरणाशी संबंध?

पूरन कुमार यांचा मृतदेह सेक्टर ११ येथील त्यांच्या घरातील तळघरात गोळी लागलेल्या अवस्थेत आढळला. त्यांनी ज्या शस्त्राने स्वतःला गोळी मारली, ते सीएफएसएल टीमने जप्त केले आहे. तसेच, घटनास्थळावरून एक मृत्युपत्र आणि एक चिठ्ठी देखील मिळाली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणाला आणखी एक वळण

पूरन कुमार पूर्वी रोहतक रेंजचे महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते आणि नुकतीच त्यांची सुनारिया येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली होती. रोहतक येथे एका दारू कंत्राटदाराने एका हेड कॉन्स्टेबल विरोधात अडीच लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार दाखल केली होती. महत्त्वाचे म्हणजे, हेड कॉन्स्टेबलने ही लाच पूरन कुमार यांच्या नावावर मागितल्याचा आरोप कंत्राटदाराने केला होता.

या हेड कॉन्स्टेबलला सोमवारी रोहतक पोलिसांनी अटक केली आहे आणि तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या सर्व प्रकरणांची कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. इंजिनिअरिंगचे पदवीधर असलेले आयपीएस अधिकारी पूरन कुमार मे २०३३मध्ये सेवानिवृत्त होणार होते. त्यांचे पार्थिव सध्या सेक्टर १६ येथील सरकारी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले असून, डॉक्टरांच्या बोर्डकडून त्याचे पोस्टमॉर्टम केले जाणार आहे.

Web Title : आईपीएस अधिकारी की आत्महत्या के बाद आईएएस पत्नी ने अधिकारियों पर आरोप लगाया; एफआईआर दर्ज

Web Summary : हरियाणा के आईपीएस अधिकारी वाई. पूरन कुमार की आत्महत्या के बाद, उनकी आईएएस पत्नी ने वरिष्ठ अधिकारियों द्वारा उत्पीड़न का आरोप लगाते हुए एफआईआर दर्ज कराई। उन्होंने आठ पन्नों के सुसाइड नोट के आधार पर उनकी गिरफ्तारी की मांग की, जिसमें मानसिक पीड़ा और रिश्वतखोरी के मामले में अधिकारियों को फंसाया गया है।

Web Title : IAS Wife Accuses Officials After IPS Officer's Suicide; FIR Filed

Web Summary : Following Haryana IPS officer Y. Puran Kumar's suicide, his IAS wife filed an FIR alleging harassment by senior officials drove him to it. She demands their arrest based on an eight-page suicide note detailing mental distress and implicating officials in a bribery case.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.