गलवान मुद्द्यावरून हवाईदल प्रमुखांचा 'हुंकार'; कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार अन् तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 10:43 AM2020-06-20T10:43:57+5:302020-06-20T11:37:06+5:30

या पासिंग आउट परेडबोरोबरच भारतीय हवाई दलाला 123 नवे जवान मिळाले आहेत. यात 19 महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

iaf chief rks bhadauria commented on galwan situation during Air Force Academy Combined Graduation Parade in hyderabad  | गलवान मुद्द्यावरून हवाईदल प्रमुखांचा 'हुंकार'; कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार अन् तैनात

गलवान मुद्द्यावरून हवाईदल प्रमुखांचा 'हुंकार'; कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार अन् तैनात

Next
ठळक मुद्देगलवान खोऱ्यात ज्या शूर सैनिकांनी प्राणाचे बलिदान दिले, ते कधीही व्यर्थ जाऊ देणार नाही - भदौरिया हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया हे अॅकेडमी फॉर कम्बाइन्ड ग्रेजुएशन परेडसाठी हैदराबाद येथे आले होते.या पासिंग आउट परेडबोरोबरच भारतीय हवाई दलाला 123 नवे जवान मिळाले आहेत.

हैदराबाद : सर्वांना माहित असायला हवे, की आपण कुठल्याही आकस्मिक परिस्थितीला चांगल्या प्रकारे प्रत्युत्तर द्यायला तयार आहोत. आणि तैनातही आहोत. मी देशाला विश्वास देतो, की आम्ही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहोत. गलवान खोऱ्यात ज्या शूर सैनिकांनी प्राणाचे बलिदान दिले, ते कधीही व्यर्थ जाऊ देणार नाही, असे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनी म्हटले आहे. ते अॅकेडमी फॉर कम्बाइन्ड ग्रेजुएशन परेडसाठी हैदराबाद येथे आले होते. यावेळी पासिंग आउट परेडदरम्यान त्यांनी जवानांना संबोधित केले. लडाखमध्ये एलएसीवर झालेल्या हिंसक चकमकीनंतर सीमेवरील तणाव वाढला आहे.

India and china standoff : भारतीय लष्कराने करार तोडला, सैनिकांवर केला हल्ला; आता चीन करतोय भलताच दावा!

यावळी हैदराबादेत चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत हौतात्म्य आलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. चीफ मार्शल भदौरिया म्हणाले, आम्ही आमच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी कोणत्यीही  परिस्थितीचा सामना करायला तयार आहोत. आपले संरक्षण दल प्रत्येक वेळी तयार आणि सतर्क असते. लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) आपण एका सूचनेवर परिस्थितीला तोंड द्यायला तयार आहोत. 

India and china standoff : 'ते अडीच हजार अन् आम्ही फक्त 300...', जखमी जवानाने वडिलांना सांगितला 'त्या' रात्रीचा थरार

या पासिंग आउट परेडबोरोबरच भारतीय हवाई दलाला 123 नवे जवान मिळाले आहेत. यात 19 महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. यावेळी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनी पासिंग आउट परेडची सलामी घेतली. 

गलवानमधील विश्वासघातकी कृत्यानंतर, आता चीन दाखवतोय 'या' महाविनाशक बॉम्बची भीती; पाहा VIDEO 

पहिल्यांदाच पालक अनुपस्थित -
यावेळी येथून तट रक्षक दल, नौ दल आणि व्हिएतनामच्या सेनिकांनीही ग्रॅज्युएशन पूर्ण केले. व्हिएतनाम एअरफोर्सच्या दोन जवानांनी येथून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. मात्र, कोरोना व्हायरस संकटामुळे या पासिंग आऊट परेडमध्ये कॅडेट्सच्या आई-वडिलांना आणि पालकांना सहभागी होता आले नाही. इतिहासात, असे पहिल्यांदाच घडले आहे

पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स'?, यांच्यामुळेच भारत-चीन आले आहेत 'आमने-सामने'

भारताची लढाऊ विमानं तैनात -
भारतीय हवाई दल प्रमुख भदौरिया यांनी नुकताच दोन दिवसांचा लेह दोरा केला. यावेळी त्यांनी लेह आणि श्रीनगरमधील एअरबेसची पाहणी केली. हे दोन्हीही एअरबेस कुठल्याही प्रकारच्या ऑपरेशनसाठी महत्वाची आहेत. तसेच चीनसोबत तणाव वाढल्यानंतर हवाई दलाने फायटर जेटसह विविध प्रकारची आवश्यक साधनेही चीनच्या नजीक असलेल्या हवाई भागात हलवली आहेत.

India and china standoff : चीनच्या अगदी जवळ जाऊन पोहोचली भारताची लढाऊ विमानं, IAF प्रमुखांनी केली पाहणी

हवाई दलाने सुखोई - 30 एमकेआय, मिराज 2000, जगुआर ही लढाऊ विमानांसह, अमेरिकन अपाचे हेलीकॉप्टर्स, चिनूक हेलिकॉप्टर्स आदी देखील महत्वाच्या ठिकाणी तैनात केली  आहेत.

Web Title: iaf chief rks bhadauria commented on galwan situation during Air Force Academy Combined Graduation Parade in hyderabad 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.