शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

Rafale Deal : 'राफेलमुळे हवाई दलाचे पंख आणखी सक्षम होणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 12:13 PM

Rafale Deal : हवाई दल प्रमुखांकडून राफेल डीलचं समर्थन

नवी दिल्ली: राफेल लढाऊ विमान खरेदी करारावरुन काँग्रेस सतत मोदी सरकारवर निशाणा साधत असताना आता हवाई दल प्रमुखांनी राफेलची गरज अधोरेखित केली आहे. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीनं राफेलची कामगिरी महत्त्वाची असेल, असं हवाई दलाचे प्रमुख बिरेंदर सिंग धनोआ यांनी म्हटलं आहे. त्यांनी चीन आणि पाकिस्तानचा उल्लेख करत देशाला राफेलची गरज असल्याचं सांगितलं. आपली शेजारी राष्ट्र अण्वस्त्र संपन्न असून त्यांच्याकडून विमानांचं आधुनिकीकरण सुरू आहे, असं हवाई दल प्रमुखांनी म्हटलं. राफेलच्या मदतीनं आम्ही संकटांचा सामना करु शकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काही दिवसांपूर्वीच वाईस चीफ एअर मार्शल एस. बी. देव यांनीही राफेल डीलचं समर्थन केलं होतं. या करारावर टीका करणाऱ्यांनी आधी खरेदी प्रकिया समजून घ्यायला हवी, असं देव म्हणाले होते. राफेल आणि एस-400 विमानांच्या मदतीनं सरकारकडून हवाई दलाच्या आधुनिकीकरणाचं काम वेगानं सुरू असल्याचं धनोआ म्हणाले.'भारतीय हवाई दलाला 42 स्क्वॉड्रन्सची गरज आहे. मात्र सध्या आमच्याकडे 31 स्क्वॉड्रन्स आहेत. आपल्या हवाई दलाकडे 42 स्क्वॉड्रन्स असल्या, तरी त्यांचं प्रमाण चीन आणि पाकिस्तानच्या एकत्रित स्क्वॉड्रन्सपेक्षा कमीच असेल,' असं धनोआ यांनी म्हटलं. गेल्या दशकभरात चीनने सीमावर्ती भागात रस्ते आणि रेल्वेचं जाळं उभारलं आहे. याशिवाय चीनचं सामर्थ्यदेखील वाढलं आहे, असं धनोआ यांनी सांगितलं.

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलindian air forceभारतीय हवाई दलchinaचीनPakistanपाकिस्तान