शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

Ashok Gehlot : "लोकशाही हा जादुई आकड्यांचा खेळ; मी स्वत:च जादूरगार होतो म्हणून हा खेळ चालला"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 2:29 PM

Ashok Gehlot And Modi Government : आमदारांमुळेच आपलं सरकार वाचलं अन्यथा आपल्याला राजीनामा द्यावा लागला असता, असं म्हणत गेहलोत यांनी आभार मानले आहेत

नवी दिल्ली - राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी गेल्या वर्षी आपल्या सरकारवर आलेल्या संकटावरून पुन्हा एकदा भाजपा आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "लोकशाही हा जादूच्या आकड्यांचा खेळ आहे. मी जादूगार होतो, म्हणून हा खेळ चालला" असं गेहलोत यांनी म्हटलं आहे. यासोबतच "आपलं सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारच" असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. गेहलोत सध्या  बीकानेर, सीकर, चुरू आणि जयपूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. 

अशोक गेहलोत यांनी प्रशासनाची शहर/गावांसोबत मोहीम' कार्यक्रमांतर्गत आयोजित शिबिरांना भेट दिली. यावेळी जनतेसमोर काँग्रेस सरकारच्या कामांचा पाढा वाचतानाच आपल्या सरकारला गेल्या वर्षी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यावरून भाजपा आणि केंद्र सरकारवर त्यांनी हल्लाबोल केला आहे. शाहपूराच्या करीरी गावात झालेल्या एका जाहीर सभेत ते बोलत होते. त्यावेळी अशोक गेहलोत आपल्या सरकारला साथ देणाऱ्या अपक्ष आणि बसपातून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या सहा आमदारांचाही उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला आहे.

"अमित शाह यांचे सर्वच प्रयत्न येथे अयशस्वी ठरले"

आमदारांमुळेच आपलं सरकार वाचलं अन्यथा आपल्याला राजीनामा द्यावा लागला असता, असं म्हणत गेहलोत यांनी आभार मानले आहेत. तसेच "अमित शाह यांचे सगळे प्रयत्न इथे अयशस्वी ठरले" असं म्हणत थेट केंद्रीय गृहमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. "आमचं सरकार वाचलंय ते या लोकांमुळेच... भाजपाने दिल्लीच्या दरबारात बसून याचा कट रचला हे आम्ही कसं विसरू शकतो. काय काय डावपेच खेळण्यात आले नाहीत... हे सगळे आमदार तब्बल 34 दिवस माझ्यासोबत हॉटेलमध्ये राहिले. 100 पैकी 19 निघून गेले... पण हा लोकशाही हा जादुई आकड्यांचा खेळ आहे. मी स्वत:च जादूरगार होतो म्हणून खेळ चालला."

"200 आमदारांपैकी 101, 100 असा आकड्यानं खेळ चालत नाही"

"जादुई आकड्याच्या खेळात 200 आमदारांपैकी 101, 100 असा आकड्यानं खेळ चालत नाही"  असं देशील अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे. गेल्या वर्षी तत्कालीन उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या नेतृत्वाखाली 18 आमदारांनी गहलोत यांच्या नेतृत्वाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत बंडखोरीचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे गेहलोत सरकारवर संकट कोसळलं होतं. मात्र पक्ष नेतृत्वानं वेळीच हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहcongressकाँग्रेस