आजी अन् आईसारखी हवी बायको; लग्नाबद्दल राहुल गांधी यांचे प्रथमच मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 06:17 IST2022-12-29T06:16:45+5:302022-12-29T06:17:59+5:30

माझ्याकडे स्वत:ची गाडी नाही. माझी आई सोनिया गांधी यांची गाडी मी नेहमी वापरतो, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

i want a wife like grandmother and mother said rahul gandhi opinion on marriage for the first time | आजी अन् आईसारखी हवी बायको; लग्नाबद्दल राहुल गांधी यांचे प्रथमच मत

आजी अन् आईसारखी हवी बायको; लग्नाबद्दल राहुल गांधी यांचे प्रथमच मत

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : माझी आई सोनिया गांधी व आजी इंदिरा गांधी यांच्यासारखे गुण अंगी असलेली व्यक्ती जीवनसाथी म्हणून मी निवडेन, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सांगितले. भारत जोडो यात्रेदरम्यान एका यू-ट्यूब चॅनलला मुलाखत देताना त्यांनी हे वक्तव्य केले.

ते म्हणाले की, माजी पंतप्रधान व माझी आजी इंदिरा गांधी यांच्या प्रेमाने माझे सारे आयुष्य व्यापले आहे. इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे गुण असलेल्या व्यक्तीशी तुम्ही विवाह कराल का, या प्रश्नावर राहुल गांधी यांनी सांगितले की, उत्तम गुण असलेल्या व्यक्तीला मी जीवनसाथी म्हणून निवडेन. 

राहुल गांधी यांच्याकडे स्वत:ची गाडी नाही

ते म्हणाले की, मी इलेक्ट्रिक स्कूटर चालविली आहे; पण इलेक्ट्रिक बाइक कधीही चालविलेली नाही. माझ्याकडे स्वत:ची गाडी नाही. माझी आई सोनिया गांधी यांची गाडी मी नेहमी वापरतो. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: i want a wife like grandmother and mother said rahul gandhi opinion on marriage for the first time