शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

'मुस्लीम महिलांनी...! मी इस्लाम नाही, ओवेसींच्या विरोधात...'; प्रभू रामचंद्रांचा उल्लेख करत माधवी लता स्पष्टच बोलल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 4:49 PM

आज (शनिवारी) त्या आपल्या मतदार संघातील विविध भागांत प्रचार करत आहेत. यावेळी त्यांनी ओवेसींच्या आरोपांवरही पलटवार केला...

हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण सध्या जबरदस्त तापताना दिसत आहे. येथे एआयएमआयएमचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात निवडणूक लढत असलेल्या भाजप उमेदवार माधवी लता ओवेसींवर सातत्याने निशाना साधताना दिसत आहेत. आज (शनिवारी) त्या आपल्या मतदार संघातील विविध भागांत प्रचार करत आहेत. यावेळी त्यांनी ओवेसींच्या आरोपांवरही पलटवार केला.

'मी इस्लाम विरोधात कसल्याही प्रकारचे भाष्य केलेले नाही' -माधवी लता म्हणाल्या, मी इस्लाम विरोधात कसल्याही प्रकारचे भाष्य केलेले नाही. मी नेहमीच असदुद्दीन ओवेसीं विरोधात प्रश्न उपस्थित केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेसोबत बोलताना माधवी लता यांनी असदुद्दीन ओवेसी आणि त्यांच्या भावाने प्रभू रामचंद्र आणि माता सीता यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांचीही आठवण करून दिली.

माधवी लता म्हणाल्या, "असदुद्दीन ओवेसी विसरले आहेत की, त्यांनी आणि त्यांच्या भावाने रामचंद्र, त्यांची माता आणि माता सीता यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. आमच्या देवांच्या बाबतीत का बोलाल?" आता, देवतांबद्दल केलेले भाष्य ऐकूण आम्ही गप्प बसू, ते दिवस संपले आहेत. आता आम्ही गप्प बसणार नाही. 

काय म्हणाल्या होत्या माधवी लता? -हैदराबादमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान, "मुस्लीम महिलांनी बुरखा घालू नये, तिहेरी तलाकच्या विरोधात उभे रहायला हवे आणि बहुपत्नीत्वाला विरोध करायला हवा, असे माधवी लता यांनी म्हटले होते. यावर, त्या इस्लाम विरोधात बोलत आहे, असा आरोप ओवेसी यांनी केला होता. यानंतर, मी मुस्लीम महिलांना सशक्त बनण्याचा सल्ला दिला आहे. असे म्हणत, मुस्लीम पुरुषांनी एकापेक्षा अधिक लग्न करावेत, असे ओवेसींना का वाटते? असा सवालही माधवी लता यांनी केला. खरे तर, जुन्या हैदराबादमध्ये दीर्घकाळ समाज कार्यात असलेल्या सामाजिक कार्यकर्ता माधवी लता, या असदुद्दीन ओवेसींसाठी एका मोठ्या आव्हानाच्या रुपात समोर येत आहेत. हैदराबादमधून आपन निवडणूक जिंकणार आणि ओवेसींचा पराभव होणार, असा दावा त्या करत आहेत.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीmadhavi lathaवि. के. माधवी लताBJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन