"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 20:43 IST2025-11-20T20:42:52+5:302025-11-20T20:43:15+5:30
CJI गवई म्हणाले, "ही विचारसरणी आपल्याला आपल्या वडिलांकडून मिळाली, जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी होते."

"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
आपण बौद्ध धर्माचे पालन करतो, मात्र कोणत्याही धर्माचे सखोल अध्ययन केलेले नाही. आपण धर्मनिरपेक्ष असून हिंदू, शीख, मुस्लीम, ख्रिश्चन आदी सर्व धर्मांवर आपला विश्वास आहे, असे भारताचे मुख्य न्यायमूर्ती (CJI) बी. आर. गवई यांनी म्हटले आहे. ते सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट्स-ऑन-रेकॉर्ड असोसिएशन (SCAORA) तर्फे आयोजित निरोप समारंभावेळी बोलत होते.
CJI गवई म्हणाले, "ही विचारसरणी आपल्याला आपल्या वडिलांकडून मिळाली, जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी होते. गवई यांनी स्पष्ट केले की, कुटुंबात कोणत्याही दर्ग्याची माहिती मिळाली की, तेथेही ते जात असत. आपल्यासाठी धर्मापेक्षाही माणुसकी आणि संविधान अधिक महत्त्वाचे आहे."
संविधान आणि डॉ. आंबेडकरांमुळेच हा प्रवास शक्य झाला -
"आपला हा संपूर्ण प्रवास संविधान आणि डॉ. आंबेडकरांमुळेच शक्य झाला. मी आज जो काही आहे, तो याच संस्थेमुळे (सुप्रीम कोर्ट) आहे. एका महानगरपालिकेच्या शाळेत जमिनीवर बसून शिकणारा मुलगा, इथवर पोहोचू शकेल, असा विचार करू शकत नव्हता. आपण नेहमीच, न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या संविधानाच्या चार मूल्यांचे पालन करण्याचा प्रयत्न केला, असेही गवीई म्हणाले. ते 23 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहे. 22 नोव्हेंबर हा त्यांचा सुप्रीम कोर्टातील कामकाजाचा शेवटचा दिवस असेल.
VIDEO | Delhi: Speaking at his farewell function, Chief Justice of India BR Gavai says, “I practice Buddhism, but I do not have any deep knowledge of any religious studies. I am truly a secular person. I believe in all religions, Hinduism, Buddhism, Sikhism, and Islam.”
— Press Trust of India (@PTI_News) November 20, 2025
(Full… pic.twitter.com/zqSo5qVuMX
"सुप्रीम कोर्ट ही व्यक्ती-केंद्रित संस्था असता कामा नये" -
गवई पुढे म्हणाले, "सुप्रीम कोर्ट ही व्यक्ती-केंद्रित संस्था असता कामा नये. "मी कधीही एकट्याने निर्णय घेतले नाहीत. प्रत्येक निर्णय संपूर्ण कोर्ट आणि सर्व न्यायाधीशांच्या सहभागातून घेतला गेला. सुप्रीम कोर्ट एक मोठी संस्था आहे आणि यात न्यायाधीश, वकील, रजिस्ट्री आणि कर्मचारी हे सर्व समान महत्त्वाचे आहेत."