नवी दिल्ली - आज भाजपाचं लक्ष संघटनेच्या विस्तारावर आहे तसे कार्यकर्ते घडवण्याकडेही प्राधान्य आहे. भाजपा हा एक असा पक्ष आहे जिथे कदाचित लोकांना वाटत असेल नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. तिसऱ्यांदा ते पंतप्रधान बनलेत. वयाच्या ५० व्या वर्षी मुख्यमंत्री बनलेत. २५ वर्ष सातत्याने प्रशासनात मुख्य आहेत परंतु हे सर्व ज्या त्या जागी आहे. यापेक्षा सर्वात जास्त म्हणजे मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. हा माझ्यासाठी गर्व आहे. जेव्हा पक्षाची बाब असेल तेव्हा नितीन नबीन हे माझे बॉस आहेत आणि मी कार्यकर्ता आहे अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. दिल्लीत भाजपा मुख्यालयात पक्षाचे १२ वे राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यावेळी पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, नितीन गडकरी, जे.पी. नड्डा, राजनाथ सिंह यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते.
नितीन नबीन यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या नेतृत्वात भाजपाने शून्यापासून शिखरापर्यंत प्रवास पाहिला आहे. यात व्यकंय्या नायडू, नितीन गडकरी यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनी संघटनेचा विस्तार केला. राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वात भाजपाने पहिल्यांदा स्वबळावर बहुमत मिळवले. त्यानंतर अमित शाहांच्या नेतृत्वात देशातील अनेक राज्यात भाजपा सरकार बनले. सलग दुसऱ्यांदा भाजपाचं केंद्रात सरकार आले. जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वात भाजपा पंचायतीपासून संसदेपर्यंत आणखी सशक्त झाली. केंद्रात तिसऱ्यांदा भाजपा एनडीएचे सरकार बनले. मी पूर्वीच्या सर्व अध्यक्षांचे आणि त्यांच्या योगदानासाठी कोट्यवधी कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करतो असं त्यांनी सांगितले.
तसेच जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल नितीन नबीन यांचं अभिनंदन करतो. मागील काही महिन्यांपासून संघटन पर्व सुरू होते. त्यात संघटनेतील राज्यस्तरीय निवडीपासून राष्ट्रीय अध्यक्ष निवडीपर्यंत व्यापक प्रक्रिया लोकशाहीपद्धतीने, भाजपाच्या संविधानानुसार सतत सुरू होती. आज ती प्रक्रिया संपन्न झाली. हे संघटन पर्व म्हणजे भाजपाचा लोकशाहीवरील विश्वास, संघटनेतील शिस्त आणि कार्यकर्ता केंद्रीत विचारांचे प्रतिक आहे असंही मोदींनी म्हटलं.
दरम्यान, नितीन नबीन हे आमच्या सगळ्यांचे अध्यक्ष आहेत. त्यांची जबाबदारी फक्त पक्ष सांभाळणे इतकेच नाही तर एनडीएचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्यात समन्वय ठेवणे हेही आहे. नितीन नबीन यांच्या संपर्कात जे कुणी आले ते त्यांच्या सरळ, विनम्रपणाची चर्चा नक्कीच करतात. भाजपा युवा मोर्चाची जबाबदारी असेल, विविध राज्यात प्रभारी म्हणून जबाबदारी असेल असो, बिहार सरकारमध्ये मंत्रिपद सांभाळणे असेल नितीन नबीन यांना जी जी जबाबदारी मिळाली ती पूर्णपणे त्यांनी सांभाळली. त्यांच्या कार्याने जबाबदारी आणखी उंचावली. २१ व्या शतकातील पहिले २५ वर्ष पाहता पाहता निघून गेले. येणारी २५ वर्ष खूप महत्त्वाची आहे. हा तो काळ आहे ज्यात विकसित भारत निर्माण होणार आहे. या महत्त्वपूर्ण कालखंडात नितीन नबीन भाजपाचा वारसा पुढे नेणार आहेत असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
Web Summary : PM Modi emphasizes his role as a BJP worker under Nitin Nabin's leadership. He lauded Nabin's appointment as party president, highlighting BJP's growth from grassroots to national power, crediting past leaders and anticipating Nabin's success in leading towards a developed India.
Web Summary : पीएम मोदी ने नितिन नबीन के नेतृत्व में भाजपा कार्यकर्ता के रूप में अपनी भूमिका पर जोर दिया। उन्होंने नबीन की पार्टी अध्यक्ष के रूप में नियुक्ति की सराहना की, जमीनी स्तर से राष्ट्रीय शक्ति तक भाजपा के विकास पर प्रकाश डाला, पिछले नेताओं को श्रेय दिया और विकसित भारत की ओर नेतृत्व करने में नबीन की सफलता की उम्मीद जताई।