शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 13:28 IST

"मुंबईतील ताज हॉटेलवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान, तेवतिया यांना अनेक जखमा झाल्या होत्या. त्यांना चार गोळ्याही लागल्या होत्या. मात्र, तरीही ते शौर्याने लढत राहिले. त्यांच्या जलद कारवाईने आणि प्रतिहल्ल्याने, त्या दिवशी १५० हून अधिक लोकांचा जीव वाचला होता."

गेल्या काही दिवसांपासून हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण जबरदस्त तापले आहे. आधी तामिळनाडूमध्ये हिंदी भाषेवरून राजकारण तापले होते आणि आता महाराष्ट्रात हिंदी-मराठी भाषेच्या मुद्यावरून राजकारण सुरू आहे. यातच आता, 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील नायक एक्स मार्कोस (मरीन कमांडो फोर्स) प्रवीण कुमार तेवतिया यांनी या वादावर भाष्य करत, थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच काही प्रश्न विचारले आहेत.

26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान ताज हॉटेलमध्येही दहशतवादी शिरले होते. तेव्हा तेथून अनेकांना वाचवणाऱ्या कमांडोने राज ठाकरे यांना सवाल केला आहे की, मुंबईतील दहशतवादी हल्ल्यावेळी तुमचे योद्धे कुठे होते? या कमांडोने सोशल मीडियावर एक फोटोही पोस्ट केला आहे. यात संबंधित कमांडो गणवेशात दिसत आहे. त्याच्या बुलेटप्रूफ जॅकेटवर UP असे लिहिलेले आहे आणि गळ्यात बंदूक दिसत आहे.

काय म्हणाले तेवतिया? -तेवतिया यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे, "मी 26/11 ला मुंबई वाचवली होती. मी उत्तर प्रदेशा आहे आणि महाराष्ट्रासाठी रक्त सांडतो. मी ताज हॉटेल वाचवले. राज ठाकरेंचे तथाकथित योद्धे कुठे होते? देशात फूट पाडू नका. हास्याला कुठल्याही भाषेची आवश्यकता नसते." तेवतिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषावादासंदर्भातील एका व्हिडिओवर प्रतिक्रिया देते ही पोस्ट केली आहे. 

कोण आहेत प्रवीण कुमार तेवतिया? -प्रवीण कुमार तेवतिया हे माजी कमांडो (MARCOS) आहेत. त्यांनी मुंबईतील ताज हॉटेलवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान, दहशतवादविरोधी कारवाईत आपल्या पथकाचे नेतृत्व केले होते. या कारवाईदरम्यान त्यांना अनेक जखमा झाल्या होत्या. त्यांना चार गोळ्याही लागल्या होत्या. मात्र, तरीही ते शौर्याने लढत राहिले. त्यांच्या जलद कारवाईने आणि प्रतिहल्ल्याने, त्या दिवशी १५० हून अधिक लोकांचा जीव वाचला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेSoldierसैनिक26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाhindiहिंदी