"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 14:09 IST2025-09-14T14:09:03+5:302025-09-14T14:09:29+5:30

पंतप्रधान मोदी म्हणाले, केंद्र आणि राज्यातील डबल इंजिन सरकार आसाम आणि ईशान्येच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे....

I am a devotee of Shiva I swallow all poison PM Modi attacks opponents congress nehru | "मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील दरंग येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूरसंदर्भात भाष्य केले. ते म्हणाले माँ कामाख्याच्या आशीर्वादाने ऑपरेशन सिंदूरला जबरदस्त यश मिळाले. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही जोरदार हल्ला चढवला. "मी भगवा न शिव यांचा भक्त आहे, सर्व विष गिळून टाकतो."

"...ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट होती" -
पंतप्रधान मोदी म्हणाले, केंद्र आणि राज्यातील डबल इंजिन सरकार आसाम आणि ईशान्येच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे. भूपेन हजारिका यांचे स्मरण करत पंतप्रधान म्हणाले, काही दिवसांपूर्वी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहणे, ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट होती. आसामच्या महान पुत्रांनी आणि पूर्वजांनी पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. पंतप्रधानांनी काँग्रेस पक्षावरही निशाणा साधला. "ज्या दिवशी भारत सरकारने भूपेन हजारिका यांना भारतरत्न दिले, त्याच दिवशी काँग्रेस अध्यक्षांनी मोदी "नाचणाऱ्या आणि गाणाऱ्यांना" भारतरत्न देत आहेत, असे म्हणत त्यांचा अपमान केला होता, अशी आठवणही त्यांनी करून दिली. ते पुढे म्हणाले, हे विधान आसाम आणि तेथील लोकांच्या योगदानाचा अपमान करणारे आहे. 

१९६२ च्या चीन युद्धाचा उल्लेख - -
१९६२ मध्ये चीनसोबत झालेल्या युद्धाचा उल्लेख करत मोदी म्हणाले, पंडित नेहरूंनी त्यावेळी केलेल्या विधानामुळे, ईशान्येकडील जखमा आजपर्यंत भरल्या गेलेल्या नाहीत. काँग्रेसची सध्याची पिढीही त्याच जखमांवर मीठ शिंपडण्याचे काम करत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी ककेला.

'मी शिव भक्त, सर्व विष गिळून घेतो...' -
पंतप्रधान म्हणाले, "मला कितीही शिव्या द्या, मी भगवान शिव यांचा भक्त आहे, सर्व विष गिळून घेतो. पण जेव्हा दुसऱ्याचा अपमान होतो, तेव्हा मी गप्प राहू शकत नाही." भूपेन दा यांना भारतरत्न देण्याचा निर्णय योग्य होता की नाही असा प्रश्नही त्यांनी यावेळी जनतेला विचारला. एवढेच नाही, तर देशातील जनता माजी मालक आहे, असेही ते यावेली म्हणाले.

Web Title: I am a devotee of Shiva I swallow all poison PM Modi attacks opponents congress nehru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.