‘मै भी चौकीदार’ मोहीम फेसबुकवरही, अमित शहांनी केली सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 02:54 IST2019-03-25T02:53:47+5:302019-03-25T02:54:05+5:30

‘देश का चौकीदार चोर है’ हा काँग्रेसचा हल्ला परतविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवर सुरू केलेली ‘मै भी चौकीदार’ मोहीम भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी फेसबुक या आणखी एका लोकप्रिय समाजमाध्यमात नेली.

'I also watch the watchman' campaign on Facebook, Amit Shah did | ‘मै भी चौकीदार’ मोहीम फेसबुकवरही, अमित शहांनी केली सुरुवात

‘मै भी चौकीदार’ मोहीम फेसबुकवरही, अमित शहांनी केली सुरुवात

नवी दिल्ली : ‘देश का चौकीदार चोर है’ हा काँग्रेसचा हल्ला परतविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवर सुरू केलेली ‘मै भी चौकीदार’ मोहीम भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी फेसबुक या आणखी एका लोकप्रिय समाजमाध्यमात नेली.
हे करत असताना अमित शहा यांनी फेसबुकवरील आपला प्रोफाइल फोटो बदलला. आता त्यांच्या प्रोफाइल फोटोमध्ये मोदी मागच्या बाजूला व अमित शहा पुढच्या बाजूला दिसतात. दोघांच्या बाजूला ‘मै भी चौकीदार’ असे हिंदीमध्ये लिहिलेले आहे. या नव्या फोटोसह टाकलेल्या अपडेटमध्ये शहा यांनी लिहिले की, ‘मै भी चौकीदार’ मोहीम अधिक बळकट करण्यासाठी मी माझा प्रोफाइल फोटो बदलला आहे. पंतप्रधान मोदींच्या या प्रयत्नांत प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे माझे आवाहन आहे. फेसबुक यूजर्सनी अशाच प्रकारे आपापले प्रोफाइल फोटो बदलावे, असेही त्यांनी
म्हटले.

प्रोफाइल बदलल्यावर हजारो लाइक्स
अमित शहा यांनी अशा प्रकारे आपले प्रोफाइल बदलल्यावर पहिल्या दोन तासांतच त्याला ४४ हजारांहून अधिक लाइक्स व २,६०० कॉमेंट््स मिळाल्या व १,३०० हून अधिक जणांनी ते प्रोफाइल शेअरही केले.

Web Title: 'I also watch the watchman' campaign on Facebook, Amit Shah did