हैदराबाद चकमकीची माजी न्यायाधीशांकडून चौकशी?; सर्वोच्च न्यायालयाकडून विचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 02:35 AM2019-12-12T02:35:18+5:302019-12-12T06:28:54+5:30

सर्वोच्च न्यायालयाच्या दिल्लीत राहणाऱ्या एखाद्या माजी न्यायाधीशांनी या घटनेची चौकशी करावी.

hyderabad case inquiry into former judge ?; The Supreme Court begins deliberations | हैदराबाद चकमकीची माजी न्यायाधीशांकडून चौकशी?; सर्वोच्च न्यायालयाकडून विचार सुरू

हैदराबाद चकमकीची माजी न्यायाधीशांकडून चौकशी?; सर्वोच्च न्यायालयाकडून विचार सुरू

Next

नवी दिल्ली : हैदराबादेतील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा चकमकीत मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांमार्फत करण्याबाबत सर्वोच्च न्यायालय विचार करीत आहे.

सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्या. एस. अब्दुल नजीर आणि न्या. संजीव खन्ना यांच्या पीठाने सांगितले की, आम्हाला असे वाटते की, सर्वोच्च न्यायालयाच्या दिल्लीत राहणाऱ्या एखाद्या माजी न्यायाधीशांनी या घटनेची चौकशी करावी. या माजी न्यायाधीशांना दिल्लीत राहून काम करावे लागेल. या चकमकीची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्यासाठी दाखल जनहित याचिकांवर गुरुवारी विचार करण्यात येणार आहे.

तेलंगणा सरकारकडून ज्येष्ठ वकील मुकुल रोहटगी आणि वकील कृष्णकुमार सिंह यांनी सांगितले की, चकमकीच्या प्रकरणात निर्देशांचे पालन करण्यात आलेले आहे. पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध स्वतंत्र तपास करण्यासाठी न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत.

Web Title: hyderabad case inquiry into former judge ?; The Supreme Court begins deliberations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.