शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

झोपडय़ांच्या आधी बुलडोझर माङयावरून जाईल!

By admin | Updated: November 29, 2014 02:04 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी दिल्लीच्या रंगपुरी भागातील इस्नयली कॅम्प झोपडपट्टी पाडण्याला जोरदार विरोध केला.

राहुल गांधी आक्रमक : झोपडपट्टी पाडण्याला विरोध, पूर्वसूचना न देता कारवाई चूकीची
नवी दिल्ली : यापुढे झोपडय़ा पाडण्यासाठी आलेला बुलडोझर आधी माङया अंगावरून जाईल, असा आक्रमक पवित्र घेत, काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी दिल्लीच्या रंगपुरी भागातील इस्नयली कॅम्प झोपडपट्टी पाडण्याला जोरदार विरोध केला. दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर आम आदमी पार्टीनेही या झोपडपट्टीवासीयांच्या आंदोलनात उडी घेतली आणि ही झोपडपट्टी अशी अवेळी म्हणजे जीवघेण्या थंडीत पाडण्यामागे भाजपाचे माजी आमदार सतप्रकाश राणा यांचा हात असल्याचा आरोप केला.
दिल्ली प्रशासनाने बुलडोझर चालवून अवघ्या काही मिनिटांच्या आत इस्नयली कॅम्प येथील शेकडो झोपडय़ा जमीनदोस्त केल्या. येथील हजारो नागरिक गेल्या दोन दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत उघडय़ावरच रात्र काढत आहेत. त्यांना मिळणा:या मदतीचा ओघ मंद असला तरी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या मुद्यावरील राजकारण मात्र कमालीचे तापले आहे. 
झोपडय़ा पाडण्यात आल्यावर राहुल गांधी यांनी तातडीने रात्री घटनास्थळी भेट दिली. राहुल गांधी हे कोणत्याही मदत सामग्रीशिवाय येथे आले असले तरी त्यांनी अतिशय आक्रमक होत झोपडपट्टी पाडण्याला विरोध केला. यावेळी राहुल गांधी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘पुढच्या वेळी बुलडोझर झोपडपट्टय़ांवरून चालण्याआधी माङया अंगावरून चालेल. कडाक्याच्या थंडीत लोकांना कोणतीही पूर्वसूचना न देता अशाप्रकारे कारवाई करणो चुकीचे आहे.’  (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4झोपडपट्टी पाडण्यात आल्यानंतर भाजपाच्या एकाही नेत्याने इस्नयली कॅम्पला भेट दिली नाही. राहुल गांधी कॅम्पवर पोहोचले तेव्हा बेघर लोक उघडय़ावरच चुली पेटवून स्वयंपाकाला  लागले होते. राहुल गांधी येताच लोक त्यांच्याकडे धावले. खा.राहुल यांनी अर्धा तास             तेथील लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. यावेळी बराच गोंधळ उडाला आणि एकवेळ चेंगराचेंगरीही होताना वाचली. 
या गोंधळातच पोलिसांनी राहुल गांधींना लोकांपासून दूर केले. या भागात अंधार असल्यामुळे गोंधळात भर पडली. लोकांनी काँग्रेसच्या समर्थनार्थ आणि भाजपाच्या विरोधात घोषणाही दिल्या.