साहेब.. पत्नी विडी ओढते, घटस्फोट मिळवून द्या; पती थेट पोहोचला पोलिसांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 09:06 IST2022-01-11T09:06:44+5:302022-01-11T09:06:44+5:30

पत्नीनं दिलेलं कारण ऐकून सर्वजण पडले अवाक्.

husband says in ssp office my wife beedi get me divorced from her in bulandshah | साहेब.. पत्नी विडी ओढते, घटस्फोट मिळवून द्या; पती थेट पोहोचला पोलिसांत

साहेब.. पत्नी विडी ओढते, घटस्फोट मिळवून द्या; पती थेट पोहोचला पोलिसांत

बुलंदशहरातील जहांगीराबाद येथे एक अजब घटना समोर आली आहे. "माझी पत्नी विडी ओढते. यामुळे मला अॅलर्जी होते. अनेकदा समजावूनही तिनं मानलं नाही. मला घटस्फोट मिळवून द्या," अशी मागणी एका व्यक्तीनं पोलिसांकडे केली आहे. यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीच्या पत्नीला बोलावून घेतलं. दरम्यान, पत्नीनं दिलेलं कारण ऐकून सर्वच जण अवाक् झाले. आपण टेन्शनमध्ये असलो तर विडी ओढतो, असं कारण तिनं पोलिसांना दिलं. परंतु आपलं लग्न वाचवण्यासाठी भविष्यात विडी ओढणार नाही, असं आश्वासनही तिनं यावेळी दिलं.

जहांगीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक व्यक्ती आठवडाभरापूर्वी एसएसपी स्थित महिला सेल कार्यालयात पोहोचला. या ठिकाणी त्या व्यक्तीनं महिला सेल प्रभारींना तक्रारीचं पत्र दिलं. तसंच आपली पत्नी विडी ओढत असल्याचंही सांगितलं. ती विडी ओढण्यामुळे आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत आहे. यासंदर्भात तिला अनेकदा समजावलं. परंतु तिनं आपली सवय ती सोडत नाही, असं त्यानं पत्रात नमूद केलंय.

माहेरीही केली तक्रार
त्या माहेरीही यासंदर्भात तक्रार केली. परंतु त्यांनी समजावल्यानंतरही पत्नी मानत नाही. तिच्या मित्रांनी कुटुंबीयांनीही तिला यासंदर्भात समजावलं असल्याचं त्यांनी सांगितलं. यानंतर संबंधित महिलेला पोलिसांनी बोलावलं. पोलिसांनी तिला कारण विचारल्यानंतर आपण जेव्हाही कोणत्याही प्रकारच्या तणावात असतो तेव्हा आपण विडी ओढत असल्याचं स्पष्टीकरण दिलं. परंतु पोलिसांनी यानंतर पती पत्नीला समजावून घरी पाठवून दिलं. 

Web Title: husband says in ssp office my wife beedi get me divorced from her in bulandshah