चुंबन घेऊन पतीनेच पत्नीची जीभ कापली, गुजरातमधील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 16:27 IST2019-10-11T16:25:29+5:302019-10-11T16:27:18+5:30
अहदाबाद- गुजरातमधील अहमदाबादच्या जुहापूरा भागात बुधवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे. चुंबन ...

चुंबन घेऊन पतीनेच पत्नीची जीभ कापली, गुजरातमधील धक्कादायक घटना
अहदाबाद- गुजरातमधील अहमदाबादच्या जुहापूरा भागात बुधवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे. चुंबन घेण्याच्या बहाण्याने पत्नीजवळ गेलेल्या पतीने धारदार शस्त्राने पत्नीची जीभच कापून टाकली. त्यानंतर महिलेला तात्काळ सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. याप्रकरणी पीडित महिलेने गुरुवारी वेजालपूर पोलीस स्थानकात पतीविरोधात तक्रार नोंदवली आहे.
जखमी महिला एका खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. 2004 साली तिचे लग्न झाले. पण, पतीसोबत मतभेद झाल्यामुळे लग्नानंतर पाच वर्षातच घटस्फोट झाला. 24 मार्च 2018 रोजी तिने जुहापूरा येथे राहणाऱ्या व्यक्तीबरोबर दुसरे लग्न केले. त्या माणसाची आधीच दोन विवाह झाले होते. याबाबत या महिलेला कल्पनाच नव्हती. लग्नानंतर आपला नवरा त्याच्या दुसऱ्या पत्नी तिच्या मुलाबरोबर राहत असल्याचे तिला समजले. त्यामुळे पीडित महिलेने पतीसोबत वाद घालायला सुरुवात केली. पत्नीच्या या व्यवहाराला कंटाळून नवऱ्याने तिला त्रास द्यायला सुरुवात केली. त्यातूनच हा प्रकार घडला आहे. गुरुवारी रात्री नवरा माझ्याजवळ आला, त्याने अगोदर चुंबन घेतले आणि काही क्षणातचं धारदार शस्त्राने माझ्या जीभेवर वार केल्याचं पीडितेनं म्हटलंय. तसेच स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी मी बहिणीला फोन केला, त्यानंतरच मला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचंही तिने म्हटलं.
दरम्यान, याबाबत पीडितेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत, नवरा काहीही काम करत नव्हता, उदरनिर्वाहासाठी मीच घर चालवत होते. त्यामुळे मी पतीला कामाला जाण्याबाबतही तगादा लावत होते, असे म्हटले आहे.