लग्नाच्या वाढदिवसाला गिफ्ट न दिल्याने पतीवर चाकूने हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 10:36 IST2024-03-07T10:35:53+5:302024-03-07T10:36:19+5:30

बेंगळुरू येथे लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पतीने गिफ्ट न दिल्याचा राग आल्याने पत्नीने पतीवर थेट चाकूने हल्ला केला. यात पतीच्या हातावर ...

Husband attacked with knife for not giving gift on wedding anniversary | लग्नाच्या वाढदिवसाला गिफ्ट न दिल्याने पतीवर चाकूने हल्ला

लग्नाच्या वाढदिवसाला गिफ्ट न दिल्याने पतीवर चाकूने हल्ला

बेंगळुरू येथे लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पतीने गिफ्ट न दिल्याचा राग आल्याने पत्नीने पतीवर थेट चाकूने हल्ला केला. यात पतीच्या हातावर चाकू लागल्याने गंभीर जखम झाली. याप्रकरणी पत्नीवर बेलंदूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महिला गृहिणी आहे.

पती रात्री कामावरून घरी आल्यानंतर झोपला होता. दरम्यान, लग्नाच्या वाढदिवसाला गिफ्ट न मिळाल्याने संतापलेल्या पत्नीने किचनमधून चाकू काढला आणि हातात घुसवला.

पत्नी त्याच्यावर आणखी चाकूने वार करण्याच्या तयारीत होती. मात्र, आणखी हल्ला करण्यापूर्वीच पतीने तिला ढकलून दिले. त्यानंतर तो शेजाऱ्यांच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयात गेला. ही कौटुंबिक बाब असल्याने आम्ही जोडप्याला या विषयावर चर्चा करण्यासाठी आणि नंतर आमच्याशी संपर्क साधण्यासाठी वेळ दिला, असे पोलिसांनी सांगितले.

आजोबांच्या मृत्यूमुळे लग्नाच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी महिलेचा पती पत्नीसाठी भेटवस्तू खरेदी करू शकला नाही. मात्र, प्रथमच गिफ्ट न दिल्याने ती नाराज होती. पत्नी काही खासगी समस्यांमुळे चिंतीत होती. तिचे समुपदेशन व्हावे, अशी इच्छा पतीने व्यक्त केली आहे.

Web Title: Husband attacked with knife for not giving gift on wedding anniversary