घरातून जोडपं चालवत होतं अश्लील व्हिडिओचं रॅकेट; ईडीच्या छाप्यानंतर २२ कोटी कमावल्याचे समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 09:30 IST2025-03-29T09:23:37+5:302025-03-29T09:30:15+5:30
नोएडामध्ये ईडीने टाकलेल्या छाप्यात श्लील व्हिडीओ बनवणाऱ्या एका जोडप्याचा पर्दाफाश झाला आहे.

घरातून जोडपं चालवत होतं अश्लील व्हिडिओचं रॅकेट; ईडीच्या छाप्यानंतर २२ कोटी कमावल्याचे समोर
Noida ED Raid: उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये अंमलबजावणी संचालनालयाने अश्लील व्हिडीओ बनवणाऱ्या एका जोडप्याचा पर्दाफाश केला. हे जोडपं अश्लील व्हिडिओ बनवून ते पॉर्न साइटला विकत होते. ईडीने नोएडा येथील सबडिगी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडवर छापा टाकला. ही कारवाई परकीय चलन व्यवस्थापन कायदा म्हणजे फेमा अंतर्गत करण्यात आली. तपासात समोर आले की उज्ज्वल किशोर आणि नीलू श्रीवास्तव त्यांच्या घरातून अॅडल्ट वेबकॅम स्टुडिओ चालवत होते. छाप्यादरम्यान मॉडेल्स घरी शो करताना आढळून आल्या आणि आठ लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली.
नोएडामधील एका घरामध्ये एक आलिशान स्टुडिओ उभारुन मॉडेल्ससह नग्न व्हिडिओ शूट केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.ईडीचे पथक छापा टाकण्यासाठी या घरी तेव्हा एका मोठ्या आणि घाणेरड्या व्यवसायाचा पर्दाफाश झाला. नोएडातल्या जोडप्याने घरातून विदेशी पॉर्न वेबसाइटला अश्लील व्हिडिओ आणि वेबकॅम शो विकून करोडो रुपये कमावले आहेत. फेसबूक पेजच्या माध्यमातून आरोपी मॉडेल्सना भरघोस पगाराचे आमिष दाखवून फसवायचे. ईडीने छापा टाकून तीन मॉडेल्सना अटक केली.
श्रीवास्तव दाम्पत्याने मिळून 'सबडीझी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड' नावाची कंपनी स्थापन सुरु केली होती. ही कंपनी ॲडल्ट व्हिडिओंचा व्यवसाय करत होती. या दाम्पत्याने 'टेक्निअस लिमिटेड' या सायप्रस कंपनीसोबत करार केला होता. 'एक्सहॅमस्टर' आणि 'स्ट्रिपचॅट' सारख्या पॉर्न वेबसाइट टेक्निअस लिमिटेडद्वारे चालवल्या जातात. दोघे पती पत्नी नोएडामध्ये पॉर्न बनवून परदेशी वेबसाइटवर पाठवायचे आणि त्या बदल्यात तिथून त्यांच्या खात्यात मोठी रक्कम पाठवली जायची.
श्रीवास्तव दाम्पत्याच्या खात्यात परदेशातून सतत मोठी रक्कम येत होती. ही कंपनी जाहिरात, मार्केट रिसर्चचे काम करत असल्याचे दाखवण्यात आलं होतं. मात्र फेमा कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे कळताच ईडीने तपास सुरु केला. त्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला. कंपनीच्या संचालकांच्या खात्यांमध्ये परदेशातून आलेले १५.६६ कोटी रुपये सापडले आहेत. याशिवाय नेदरलँडमध्येही एक खाते सापडलं ज्यामध्ये ७ कोटी रुपये पाठवण्यात आले होते. ही रक्कम आंतरराष्ट्रीय डेबिट कार्डद्वारे भारतात रोख स्वरूपात काढण्यात आली. आतापर्यंत २२ कोटींहून अधिकची कमाई सापडली आहे.
ED on 28.03.2025 conducted searches under the provisions of Foreign Exchange Management Act in the case of Subdigi Ventures Private Limited. ED investigation revealed that a Noida-based couple named Ujjwal Kishore and Neelu Srivastava, Directors of the company, was running an…
— ANI (@ANI) March 28, 2025
फेसबुकच्या माध्यमातून हे जोडपे मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलींना फसवत होतं. यासाठी फेसबुक आणि अन्य काही संकेतस्थळांवर जाहिराती देण्यात आल्या होत्या. जाहिरात पाहून आलेल्या मुलींना जास्त पैसे देण्याचे आमिष दाखवून त्यांना या व्यवसायात पाडलं गेलं. व्हिडिओंमधून कमाईच्या २५ टक्के भाग मॉडेल्सना देण्यात आला होता.