शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 18:39 IST

एक्झिट पोलचे आकडे आल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी अर्थात रविवारी नायब सैनी यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी, हरियाणात भाजप सरकार स्थापन होत असल्याचे म्हटले आहे.

पंचकुला - हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर शनिवारी सायंकाळी एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. एक्झिट पोलमध्ये भाजपला जोरदार झटका बसत असल्याचे चित्र आहे. भाजपला 20-28 जागा मिळण्याची शक्यता या एक्झिट बोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. अर्थात भाजप सत्तेपासून बराच दूर दिसत आहे. कारण हरियाणामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी कुठल्याही पक्षाला 46 जागांची आवश्यकता आहे.

एक्झिट पोलचे आकडे आल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी अर्थात रविवारी नायब सैनी यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी, हरियाणात भाजप सरकार स्थापन होत असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, तर आपण पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार आहोत, असेही सैनी यांनी म्हटले आहे.

आमच्याकडे सरकार स्थापनेची सर्व व्यवस्था - नायब सैनी म्हणाले, आम्हाला पूर्ण बहुमत मिळत आहे. सरकार स्थापनेची सर्व व्यवस्था आमच्याकडे आहे. गरज भासल्यास आम्ही इतर पक्षांशीही बोलू शकतो. आयएनएलडी, जेजेपी आणि अपक्षांच्या पर्यायांचाही विचार केला जाऊ शकेल.

एक्झिट पोलच्या आकड्यांवर काँग्रेस खूश -याचवेळी, एक्झिट पोलच्या आकड्यांवर काँग्रेस खूश दिसत आहे. या आकडेवारीनुसार काँग्रेस हरियाणात पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करताना दिसत आहे. काँग्रेसला 50-58 जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, खरे चित्र 8 ऑक्टोबरलाच स्पष्ट होईल.

2005 ते 2014 या कालावधीत काँग्रेसची सत्ता - राज्यात 2005 ते 2014 या कालावधीत काँग्रेसचे सरकार होते. यानंतर गेली 10 वर्षे भाजपची सत्ता आहे. एक्झिट पोलनुसार, काँग्रेसला बहुमतासाठी लागणाऱ्या जागांपेक्षाही कितीतरी अधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

 

टॅग्स :HaryanaहरयाणाBJPभाजपाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक 2024