'डिजिटल अरेस्ट' पासून कसे वाचायचे? समन्स खरे की खोटे असे ओळखा; ईडीने सगळीच माहिती सांगितली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 15:14 IST2025-10-08T15:13:18+5:302025-10-08T15:14:13+5:30
सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी नवीन पद्धतीचा वापर करत आहेत. काही दिवसांपासून फसवणुकीची प्रकरणे वाढली आहेत.

'डिजिटल अरेस्ट' पासून कसे वाचायचे? समन्स खरे की खोटे असे ओळखा; ईडीने सगळीच माहिती सांगितली
देशात सायबर गुन्ह्यांची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी नवीन पद्धत शोधत आहेत. सध्या, डिजिटल अरेस्टची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. ईडीने जनतेला बनावट समन्सबाबत सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. काही दिवसापूर्वी ईडीच्या नावाने बनावट समन्स आणि नोटिसा पाठवून व्यक्तींना फसवणूक करण्याचे किंवा त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे प्रयत्न झाले आहेत. हे बनावट समन्स खऱ्या समन्ससारखे दिसतात, यामुळे जनतेला खरे आणि खोटे समन्स ओळखणे कठीण होते.
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व खरे समन्स आता या प्रणालीद्वारे जारी केले जातात, यामध्ये एक क्यूआर कोड आणि एक पासकोडचा समावेश आहे. यामुळे कोणालाही समन्स खरे आहे की खोटे हे सहजपणे पाहता येते. समन्सवर जारी करणाऱ्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी, शिक्का, अधिकृत ईमेल पत्ता आणि फोन नंबर देखील असतो.
खरे की खोटे समन्स
समन्स खरे आहे की नाही हे तपासण्याचे दोन पर्याय आहेत. पहिला म्हणजे खरे आणि खोटे समन्स ओळखण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी QR कोड स्कॅन करणे. हे करण्यासाठी, तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.
समन्सवर छापलेला QR कोड तुमच्या मोबाईल फोनने स्कॅन करा.
स्कॅन केल्याने ED वेबसाइटवर एक पेज उघडेल.
त्या पेजवर समन्सवर पासकोड एंटर करा. जर माहिती बरोबर असेल, तर वेबसाइट समन्सशी संबंधित सर्व माहिती दिसेल.
दुसरी पद्धत ईडीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन समन्स तपासणे. ही पद्धत देखील सोपी आहे आणि तुम्ही काही पायऱ्या फॉलो करून समन्स तपासू शकता.
ईडीच्या https://enforcementdirectorate.gov.in या वेबसाइटला भेट द्या. 'Verify Your Summons' या पर्यायावर क्लिक करा. समन्स क्रमांक आणि पासकोड एंटर करा. जर माहिती बरोबर असेल, तर समन्सची प्रत्यक्ष माहिती वेबसाइटवर दिसेल.
समन्स बजावल्यानंतर २४ तासांनंतर ही चौकशी करता येते.
डिजिटल अटक पूर्णपणे बनावट
काही फसवणूक करणारे लोक "डिजिटल अरेस्ट" किंवा "ऑनलाइन अटक" च्या बहाण्याने लोकांना धमकी देऊन पैसे उकळत आहेत. "असा कोणताही कायदा नाही. ईडीकडून केलेली अटक नेहमीच कायदेशीर प्रक्रियेनुसार समोरासमोर केली जाते, ऑनलाइन किंवा डिजिटल पद्धतीने अटक केली जात नाही.