शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Coronavirus: तिसरी लाट आली हे कसे ओळखायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 9:52 AM

अलीकडेच इंडियन मेडिकल असोसिएशन, या देशातील सर्वोच्च वैद्यकीय संघटनेने ‘कोरोनाची तिसरी लाट अटळ’ असल्याचा इशारा दिला.

लोकमत न्यूज नेटवर्क : सिमला-कुलू मनाली तसेच इतर पर्यटन स्थळांवरची गर्दी पाहून अलीकडेच इंडियन मेडिकल असोसिएशन, या देशातील सर्वोच्च वैद्यकीय संघटनेने ‘कोरोनाची तिसरी लाट अटळ’ असल्याचा इशारा दिला. केंद्र सरकारही सातत्याने तिसऱ्या लाटेविषयी इशारे देत आहे. कोरोनाची ‘आर व्हॅल्यू’ तूर्तास ०.८८ एवढी असून ती १.० वर पोहोचताच तिसऱ्या लाटेवर शिक्कामोर्तब होणार आहे. याबाबतही केंद्राने सर्व राज्यांना सतर्क केले आहे. जाणून घेऊ या ‘आर व्हॅल्यू’ काय आहे ते...

‘आर व्हॅल्यू’ म्हणजे काय, ती कशी मोजतात?

- डेटा सायन्सनुसार आर व्हॅल्यू म्हणजे कोरोना विषाणूचा रिप्रोडक्शन रेट म्हणजेच पुनरुत्पादन होण्याचा दर

- एक बाधित व्यक्ती किती जणांना बाधित करू शकते, हे ‘आर व्हॅल्यू’ सांगते. जर १.० बाधित आणखी १.० जणांना बाधित करत असतील तर ‘आर व्हॅल्यू’ १.० इतकी असते.

- जर १०० बाधित आणखी ८० जणांपर्यंत हा संसर्ग पोहचवत असतील तर ‘आर व्हॅल्यू’ ०.८० इतकी असेल.

चेन्नईच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसच्या (आयएमएससी) अभ्यासानुसार सध्या देशाचा सरासरी ‘आर व्हॅल्यू’ १.० पेक्षा कमी असली तरी काही राज्यांत ती झपाट्याने वाढत आहे.

‘आर व्हॅल्यू’ १.० पेक्षा अधिक होणे म्हणजे रुग्ण वाढू लागल्याचे संकेत आहेत. हे टाळण्यासाठी मास्क, सुरक्षित अंतर आदी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. - अजय भल्ला, केंद्रीय गृह सचिव

राज्यनिहाय ‘आर व्हॅल्यू’

अरुणाचल प्रदेश : १.१४मणिपूर : १.०७  मेघालय : ०.९२त्रिपुरा : १.१५  मिझोराम : ०.८६सिक्कीम : ०.८८ आसाम : ०.८६

महाराष्ट्र : ३० मे रोजी  

‘आर व्हॅल्यू’: ०.८४जूनअखेरीस : ०.८९ झाली. या दरम्यान रुग्ण वाढले

केरळ  ‘आर व्हॅल्यू’ : ०.८४ जुलैच्या सुरुवातीलाच ‘आर व्हॅल्यू’: १.१० इतकी.रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे

१५ फेब्रुवारीनंतर ‘आर व्हॅल्यू’: ०.९३ वरून १.०२ वर रुग्ण वाढू लागल्याचे संकेत

९ मार्च ते २१ एप्रिलदरम्यान ‘आर व्हॅल्यू’: १.३७ वर. या काळात रुग्णवाढ वेगाने

दुसरी लाट वाढ सर्वोच्च स्थानाच्या दिशेने२४ एप्रिल ते १ मे दरम्यान  ‘आर व्हॅल्यू’ : १.१८ वर. रुग्ण कमी होऊ लागले

१ मे ते ७ मे दरम्यान ‘आर व्हॅल्यू’ : १.१० वर. रुग्ण कमी होऊ लागले

१५ मे ते २६ मे दरम्यान ‘आर व्हॅल्यू’: ०.७८. रुग्णसंख्येचा आलेख झपाट्याने घसरू लागला

सद्य:स्थिती२० जून ते ७ जुलै दरम्यान ‘आर व्हॅल्यू’: ०.८८

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई