शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

नितीशकुमार यांना गांधी व गोडसे यांचे विचार कसे चालतात -प्रशांत किशोर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 2:56 AM

नितीशकुमार यांनी मला पक्षातून काढल्याने मी नाराज नाही. त्यांनी मला कायम मुलासारखे वागविले

एस. पी. सिन्हा पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना महात्मा गांधी व त्यांचा मारेकरी नथुराम गोडसे या दोघांची विचारसरणी कशी मान्य होते, असा सवाल निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मंगळवारी केला. सीएए, एनआरसी या मुद्यांबाबत नितीशकुमार यांनी घेतलेल्या भूमिकेवर टीका केल्याने प्रशांत किशोर यांची अलीकडेच संयुक्त जनता दलातून हकालपट्टी केली.

नितीशकुमार यांनी मला पक्षातून काढल्याने मी नाराज नाही. त्यांनी मला कायम मुलासारखे वागविले, पण माझे त्यांच्याशी वैचारिक मतभेद आहेत, असे सांगतच प्रशांत किशोर यांनी नितीश यांच्या राजकारणावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, महात्मा गांधी व गोडसे यांची विचारसरणी परस्परविरोधी आहे. त्यामुळे नितीशकुमार यांना हे दोन्ही विचार कसे काय चालतात? ते भाजपच्या प्रत्येक निर्णयाचे समर्थन कसे काय करतात? भाजपच्या उमेदवारांसाठी सभा कशा घेतात? बिहारमध्ये नितीशकुमार यांनी खूप सुधारणा केल्या, हे खरे नाही. आजही बिहार देशातील मोठे व मागास राज्यच आहे. बिहारची २00५ मध्ये जी स्थिती होती, त्यात काहीच बदल झालेला नाही. बिहार आताही तितकेच मागास आहे, अशी टीकाही प्रशांत किशोर यांनी केली. ते म्हणाले की, बिहारमध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण राज्याच्या ८ हजारांहून अधिक गावांतील लोकांना संघटित करणार आहोत.आतापर्यंतचा प्रवासच्प्रशांत किशोर यांनी पाच वर्षांपूर्वी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी नितीशकुमार यांच्या पक्षाची निवडणूक रणनीती ठरवली होती. त्याआधी २0१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या कंपनीने भाजप व नरेंद्र मोदी यांची रणनीती ठरविण्याचे काम केले होते.च्दोन वर्षांपूर्वी प्रशांत किशोर यांनी संयुक्त जनता दलात अधिकृतपणे प्रवेशही केला. मात्र, नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांनी आम आदमी पक्षासाठी रणनीती ठरविण्याचे काम केले. त्यामुळे संयुक्त जनता दलात अस्वस्थता होती.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा