'वीर सावरकरांचा काँग्रेस किती अपमान करणार?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 03:11 IST2020-01-04T03:10:37+5:302020-01-04T03:11:06+5:30

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा सवाल

'How much humiliation of Veer Savarkar's Congress?' | 'वीर सावरकरांचा काँग्रेस किती अपमान करणार?'

'वीर सावरकरांचा काँग्रेस किती अपमान करणार?'

नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी देशासाठी केलेल्या त्यागाचा काँग्रेस किती काळ अपमान करणार? असा सवाल केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी केला. काँग्रेस सेवादलाच्या नियतकालिकामध्ये वि. दा. सावरकर यांच्याबद्दल अपमानास्पद मजकूर प्रकाशित झाला आहे. याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही सावरकरांबद्दल वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला होता. काँग्रेस महाराष्ट्रातील सत्तारुढ आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करण्याचा काँग्रेसला जन्मसिद्ध हक्क मिळाला आहे काय, असा सवाल इराणी यांनी
केला. भाजपचे सरचिटणीस अनिल जैन यांनीही या मजकुराबद्दल काँग्रेसने माफी मागावी, अशी मागणी केली आहे. सावकरांच्या त्यागाची काँग्रेसला जाणीव नसल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: 'How much humiliation of Veer Savarkar's Congress?'