शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

कपड्यांवर किती खर्च करतात पंतप्रधान नरेंद्र मोदी ?, आरटीआयमधून माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 6:15 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःच्या कपड्यांवर किती खर्च करतात, याची माहिती आरटीआयमधून उघड झाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते रोहित सबरवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कपड्यांवर सरकार किती खर्च करते, यासंदर्भात अर्ज करून माहिती मागवली होती.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःच्या कपड्यांवर किती खर्च करतात, याची माहिती आरटीआयमधून उघड झाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते रोहित सबरवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कपड्यांवर सरकार किती खर्च करते, यासंदर्भात अर्ज करून माहिती मागवली होती. विशेष म्हणजे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग यांच्या कपड्यांवरही सरकारनं किती खर्च केला, याबाबतही अर्जातून विचारणा केली होती. त्यावर पंतप्रधान कार्यालयानंही स्पष्टीकरण दिलं आहे. आम्ही कोणत्याही माजी पंतप्रधानांच्या खासगी बाबींसंदर्भात अधिकृत रेकॉर्ड ठेवत नाही. तसेच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कपड्यांवर कोणताही खर्च करत नाही, मोदी स्वखर्चानं कपडे विकत घेतात, असं उत्तरही पंतप्रधान कार्यालयानं माहिती अधिकार कार्यकर्ते रोहित सबरवाल यांना दिलं आहे.रोहित सबरवाल म्हणाले, अनेकांना वाटतं केंद्र सरकार पंतप्रधानपदाच्या व्यक्तीच्या कपड्यांवर पैशांची उधळपट्टी करते. परंतु केंद्र सरकार पंतप्रधानांच्या कपड्यांवर कोणताही खर्च करत नाही, ही माहिती मला आरटीआयमधून प्राप्त झाली आहे. अनेक राजकीय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पेहरावावरून टीका करत असतात. तसेच त्यांचं कपाट महागड्या कपड्यांनी भरलेलं आहे, असा आरोपही विरोधकांनी केला होता. त्याच पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते रोहित सबरवाल यांनी माहिती मागवली होती.गेल्या वर्षी अरविंद केजरीवालांनीही मोदी प्रत्येक दिवशी कपड्यांवर 10 लाख खर्च करतात, असा आरोप केला होता. मोदींच्या सुटाच्या किमतीवरून अनेक वादही उद्भवले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमातून सुटाची किंमत 10 लाखांच्या आसपास असल्याचं दाखवण्यात आलं होतं. या महागड्या सुटावरूनच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकार सूट-बूटवाली सरकार असल्याची टीकाही केली होती. तेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कपड्यांची स्टाईल प्रसिद्धीच्या झोतात आली होती. परंतु आता माहिती अधिकार कार्यकर्त्यानं आरटीआयच्या माध्यमातून खुलासा केल्यामुळे मोदींच्या कपड्यांबाबतचे वाद शमले, अशी आशा व्यक्त केली जात आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRight to Information actमाहिती अधिकार