बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 12:01 IST2025-09-29T12:00:25+5:302025-09-29T12:01:15+5:30

बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत. तर बहुमतासाठी एकूण 122 जागांची आवश्यकता असते. दरमयान एक नवा धक्कादायक सर्व्हे समोर आला आहे.

How many seats will Nitish Kumar's party get in Bihar Will Tejashwi perform brilliantly What will happen to BJP New survey's shocking prediction! | बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!

बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!

बिहार विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिनेच शिल्लक असून राजकीय वातावरण जबरदस्त तापल्याचे दिसत आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत. तर बहुमतासाठी एकूण 122 जागांची आवश्यकता असते. दरमयान एक नवा धक्कादायक सर्व्हे समोर आला आहे.

एनडीएला किती जागा मिळणार? -
खरे तर, टाईम्स नाऊ आणि जेव्हीसीने हा ताजा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएला 130 ते 150 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, यात भाजप एकट्याच्या बळावर 66 ते 77 जागा जिंकू शकते, तर मुख्यमंत्री नीतीश कुमार यांची जनता दल (युनायटेड) 52 ते 58 जागांवर विजय मिळवू शकते. एनडीएतील इतर सहकाऱ्यांना 13 ते 15 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

महागठबंधनला किती जागा? -
महागठबंधनचा विचार करता, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधनला 81 ते 103 जागा मिळू शकतात, असे सर्व्हेमध्ये म्हणण्यात आले आहे. यात राजद (RJD) 57 ते 71 जागांवर आघाडी घेऊ शकते, तर काँग्रेसला 11 ते 14 जागांवरच विजय मिळण्याची शक्यता आहे. इंडिया ब्लॉकमधील इतरांना 13 ते 18 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

यावेळी जन सुराजचीही एंट्री... -
यावेळी, प्रशांत किशोर यांचा जन सुराज पक्ष पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. त्यांच्या पक्षाला 4 ते 6 जागा मिळण्याची शक्यता आहे. ही आकडेवारी लहान वाटत असली तरीही, निवडणूक अटीतटीची झाली, तर सत्तेच्या गणितात प्रशांत किशोर ‘किंगमेकर’ही ठरू शकतात. महत्वाचे म्हणजे, 2020 मध्ये झालेल्या बिहार निवडणुकीत AIMIM ने 5 जागा जिंकल्या होत्या. यावेळी त्यांचा ग्राफ घसरताना दिसत आहे. याशिवाय, मायावतींची बसपा आणि इतरांना मिळून 5-6 जागांवरच समाधान मानावे लागू शकते.
 

Web Title : बिहार चुनाव सर्वेक्षण: एनडीए की जीत की संभावना, तेजस्वी का प्रदर्शन महत्वपूर्ण

Web Summary : बिहार के आगामी चुनाव में एनडीए को 130-150 सीटें मिलने की संभावना है, जिसमें भाजपा आगे है। तेजस्वी यादव के नेतृत्व वाला महागठबंधन 81-103 सीटें हासिल कर सकता है। प्रशांत किशोर की पार्टी किंगमेकर बन सकती है।

Web Title : Bihar Election Survey: NDA Likely to Win, Tejashwi's Performance Key

Web Summary : Bihar's upcoming election shows NDA likely winning 130-150 seats, BJP leading. Mahagathbandhan, led by Tejashwi Yadav, could secure 81-103 seats. Prashant Kishor's party might be a kingmaker.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.