दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 21:04 IST2026-04-06T21:01:41+5:302026-04-06T21:04:47+5:30

पश्चिम आशियात युद्धामुळे अस्थिरता असून, होर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेल आणि तेलाच्या व्यापारावर परिणाम झाला आहे. 

How many Indian ships crossed the Strait of Hormuz in two days; Central government informed about the current situation | दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती

दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती

होर्मुझ सामुद्रधुनी अजूनही पूर्णपणे खुली झालेली नाही. काही देशांच्या जहाजांना जाण्याची परवानगी दिली असली, तरी अजूनही त्याचे प्रमाण कमीच आहे. भारताची अनेक जहाजे पर्शियन गल्फ आणि पश्चिम फारस खाडीमध्ये अडकली आहेत. याबद्दल केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली. गेल्या दोन दिवसात भारताच्या २ एलपीजी जहाजांनी होर्मुझ पार केल्याचे केंद्रीय अधिकाऱ्यांनी सांगितले. 

केंद्र सरकारच्या बंदरे, जहाज बांधणी आणि सागरी मार्ग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मुकेश मंगल यांनी आखाती देशात अडलेल्या भारतीय जहाजे आणि नाविकांची माहिती दिली. 

मंगल यांनी सांगितले की, "या क्षेत्रात असलेले सर्व भारतीय नागरिक सुरक्षित आहेत. मागील २४ तासांमध्ये भारतीय ध्वज असलेल्या कोणत्याही जहाजासोबत दुर्घटना झालेली नाही. मागील दोन दिवसांमध्ये भारतीय ध्वज असलेले ग्रीन सानवी आणि ग्रीन आशा या दोन एलपीजी जहाजांनी सुरक्षितपणे होर्मुझ सामुद्रधुनी पार केली आहे." 

दोन जहाजांमध्ये किती टन एलपीजी?

"ग्रीन सानवी जहाजामध्ये जवळपास ४६.५ हजार मेट्रिक टन एलपीजी आहे. या जहाजावर २५ नाविक आहेत. तर ग्रीन आशा या जहाजावर १५.५ हजार मेट्रिक टन एलपीजी असून, २६ नाविक आहेत", अशी माहिती मंगल यांनी सोमवारी (६ एप्रिल) दिली. 

भारताची अजून किती जहाजे अडकली आहेत?

पश्चिम फारस खाडीमध्ये भारतीय झेंडा असलेली १६ जहाजे अडकून पडली आहेत. या जहाजांवर ४३३ नाविक आहेत. डीजी शिपिंगने समुद्रातील जहाजांवर काम करणाऱ्या तब्बल १६०० नागरिकांना परत आणले आहे.  

होर्मुझ सुरू करण्यासाठी ट्रम्प यांचा दबाव

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी इराणवर दबाव टाकला जात आहे. ट्रम्प यांच्याकडून सातत्याने होर्मुझ मुद्द्यावर जोर दिला जात असून, रविवारी केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी इराणला उद्ध्वस्त करण्याची धमकीही दिली.

होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात पाठवू, असे म्हणत इराणला शिवीगाळ केली. ट्रम्प यांच्या धमक्यांनंतर इराणनेही आता शस्त्रसंधी होणार नाही, असे म्हटले आहे. 

Web Title : भारत के जहाजों ने होर्मुज जलडमरूमध्य पार किया: सरकार ने बताई स्थिति

Web Summary : हाल ही में दो भारतीय एलपीजी जहाज सुरक्षित रूप से होर्मुज जलडमरूमध्य से गुजरे। 433 नाविकों के साथ सोलह भारतीय जहाज अभी भी फारस की खाड़ी में फंसे हुए हैं। अमेरिका ईरान पर जलडमरूमध्य खोलने का दबाव डाल रहा है।

Web Title : India's Ships Navigate Hormuz Strait: Government Reveals Current Status

Web Summary : Two Indian LPG ships safely crossed Hormuz Strait recently. Sixteen Indian ships remain stranded in the Persian Gulf with 433 sailors. The US pressures Iran to open the strait.