राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 18:07 IST2025-11-14T18:06:54+5:302025-11-14T18:07:25+5:30
येत असलेल्या निकालांनुसार, NDA ने निर्णायक आघाडी मिळवली आहे आणि स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करताना दिसत आहे.

राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली!
बिहार विधानसभा निवडणुकीच्या ताज्या निकालांनुसार, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीए दोन-तृतीयांश बहुमताच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. तर काँग्रेस–राजद नेतृत्वातील महाअघाढीचा ऐतिहासिक पराभव होताना दिसत आहे. दरम्यान आता भाजपने विरोधकांवर आणि विशेषतः राहुल गांधींवर थेट निशाण साधताना दिसत आहे.
भाजप नेते अमित मालवीय यांनी राहुल गांधी यांची खिल्ली उडवत, “राहुल गांधी! एक आणखी निवडणूक! एक आणखी पराभव!”, जर निवडणूक पराभवात सातत्यासाठी एखादा पुरस्कार असता, तर त्यांनी ते सर्व पुरस्कार जिंकले असते. खरे तर, पराभवही विचार करत असेल की, ते त्याचा शोध कसा घेतात.
सुधांशु त्रिवेदी यांनी कबीरदास यांच्या एका दोह्याचा आधार घेत काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, "बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलया कोई। जो मन खोजा अपना, तो मुझसे बुरा न कोई." एवढेच नाही तर, निकालाची पुष्टी करण्यासाठी मतदार यादीची पुनर्पडताळणी करण्याचा सल्लाही दिला.
उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी बिहारच्या मतदारांनी दिलेला मेसेज अत्यंत स्पष्ट असल्याचे म्हटले आहे. जनतेने जंगलराज, कट्टरता, भ्रष्टाचार, तुष्टीकरण आणि परिवारवाद नाकारून सुशासन आणि विकासाला मत दिल्याचे म्हटले आहे.
भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनीही राहुल गांधींवर निशाणा साधत त्यांची खिल्ली उडवली आहे. ते म्हणाले, "राहुल गांधी नंबर वन आहेत. 'निर्विवाद, अप्रतिद्वंद्वी आणि अपराजेय'." एढेच नाही तर, "95 निवडणुकीत पराभव झाला आणि मोजणे सुरू आहे. जवाहरलाल नेहरूंच्या वाढदिवसाच्या दिवशीच हा दिवस येणे योगायोग नाही"
येत असलेल्या निकालांनुसार, NDA ने निर्णायक आघाडी मिळवली आहे आणि स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करताना दिसत आहे.