शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
9
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
11
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
12
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
13
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
14
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
15
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
16
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
17
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

कथित नक्षलवाद्यांच्या तपासाचे कागदपत्र भाजपकडे कसे आले? काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2018 5:18 PM

भाजपने ज्या पोलिसांकडील कागदपत्रांवरून आरोप केले आहेत, ते भाजपच्या प्रवक्त्याकडे कसे आले? ही अघोषित आणिबाणी आहे. पक्ष, सरकार आणि तपास यंत्रणा असा वेगळेपणा राहिलाच नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

नवी दिल्ली : कथित नक्षलवाद्यांच्या अटकेवरून काँग्रेस-भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. नक्षलवाद्यांसोबत काँग्रेसचे संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर काँग्रेसने भाजपवर पलटवार केला आहे. भाजप ही देशाची तपास यंत्रणा म्हणून काम करतेय का, असा आरोप केला आहे. भाजपने ज्या पोलिसांकडील कागदपत्रांवरून आरोप केले आहेत, ते भाजपच्या प्रवक्त्याकडे कसे आले? ही अघोषित आणिबाणी आहे. पक्ष, सरकार आणि तपास यंत्रणा असा वेगळेपणा राहिलाच नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

कथित नक्षल समर्थकांच्या अटकेविरोधात बाजू मांडणाऱ्या काँग्रेसवर भाजपने आज जोरदार टीका केली. भाजपाचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी काँग्रेसला नक्षलवाद्यांप्रती सहानुभूती असलेला पक्ष म्हटले आहे. तसेच जेव्हा काँग्रेस सत्तेत होती तेव्हा त्यांनी नक्षलवाद्यांबाबत दुटप्पी भुमिका घेतली होती. मनमोहन सिंह यांच्यासह काही जण नक्षलवाद्यांपासून देशाला मोठा धोका नसल्याचे म्हटले होते. तर निम्मे मंत्री नक्षलवाद्यांच्या विरोधात होते. यावरून काँग्रेस देशाच्या सुरक्षेबाबतही कोणत्याही थराला जाऊ शकते, असा आरोप केला.

विनायक सेन यांना 2010 मध्ये देशद्रोही घोषित केले गेले होते. यानंतर त्यांना नियोजन आयोगाच्या आरोग्य समितीमध्ये घेतले होते. यावरून काँग्रेस किती दुटप्पी होती, हे दिसते, असेही पात्रा म्हणाले. तसेच जयराम रमेश यांच्यावरही टीका करताना ज्या महेश राउत याला भीमा कोरेगाव प्रकरणात अटक केली होती. त्याला युपीए सरकानेही अटक केली होती. त्यावेळी जयराम रमेश यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहिले होते. रमेश यांनी या व्यक्तीला चांगला माणूस म्हटले होते. पंतप्रधान ग्रामीण विकास योजनेत त्याने सहभाग घेतला होता, असे पात्रा यांनी म्हटले आहे.  

याविरोधात काँग्रेसचे प्रवक्ता मनीष तिवारी यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. याचबरोबर राफेल सौदा, इंधनाच्या वाढत्या किंमती, रशियासोबतचा ए-103 असॉल्ट रायफलच्या करारवरूनही जोरदार टीका केली. 

तपासाआधीच कागदपत्र कसे आले ?पोलीस नक्षलवाद्यांशी संबंधीत प्रकरणांचा तपास करत आहे. या तपासाची कागदपत्रे भाजपच्या प्रवक्त्याकडे कशी आली. याची आधी चौकशी व्हायला हवी. जर कोणत्याही पोलीस खात्याने तपासाचे कागदपत्र न्यायालयात सादर केले असल्यास ते कागदपत्र सार्वजनिक मानले जातात. मात्र, चौकशी सुरु असतानाच कथित कागद भाजपकडे येमे याला काय म्हणावे, अपप्रचार करण्यासाठीच हे कागद भाजपकडे येत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला. 

नाझी सरकारशी मोदी सरकारची तुलना तामिळनाडूमध्ये भाजपविरोधात घोषणा देणाऱ्या व्यक्तीला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली. अनुशासन हा खूप जटील शब्द आहे. अनुशासनवाद हुकुमशाही आणि फॅसिस्टविचारसरणी य़ांचे अर्थ एकसारखेच आहेत. जनतेला शब्दांच्या मायाजालात अडकविण्यात येत आहे. अनुशासनवाद हेच फॅसिस्टविचारसरणीचे दुसरे नाव आहे. मोदी यांनी याच अर्थाने शब्दप्रयोग केल्याचा आरोप तिवारी यांनी केला.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीcongressकाँग्रेसSambit Patraसंबित पात्राBJPभाजपाPoliceपोलिस