शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

"अखिलेशजी जात कशी काय विचारली?", जुना व्हिडीओ शेअर करत अनुराग ठाकूर यांचा निशाणा   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 16:55 IST

Anurag Thakur Vs Akhilesh Yadav: भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींची जात विचारल्याने सुरू झालेल्या वादात समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही उडी घेत सभागृहात कुणाची जात कशी विचारली जाऊ शकते? असा सवाल आक्रमकपणे विचारला होता. त्याला आता अनुराग ठाकूर यांनी अखिलेश यादव यांच्याच व्हिडीओंच्या माध्यमातूनच प्रत्युत्तर दिलं आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये जातिनिहाय जनगणनेवरून सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षातील काँग्रेस आमने-सामने आले आहेत. अर्थसंकल्पावर भाषण करताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जातिनिहाय जनगणनेसाठी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी राहुल गांधी यांच्यावर निशाणाी साधला होता. त्यानंतर या वादात समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही उडी घेत सभागृहात कुणाची जात कशी विचारली जाऊ शकते? असा सवाल आक्रमकपणे विचारला होता. त्याला आता अनुराग ठाकूर यांनी अखिलेश यादव यांच्याच व्हिडीओंच्या माध्यमातूनच प्रत्युत्तर दिलं आहे.

अनुराग ठाकूर यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर दिखावूपणा आणि सत्य असा उल्लेख करत अखिलेश यादव यांचे दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमधील एका बाजूला अखिलेश यादव यांनी नुकत्याच केलेल्या विधानाची चित्रफित आहे. तर दुसऱ्या बाजूला अखिलेश यादव यांनी काही पत्रकारांशी साधलेल्या संवादाची चित्रफित आहे. 

दरम्यान, अनुराग ठाकूर यांचं हे ट्विट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अनुराग ठाकूर यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओच्या पहिल्या भागात अखिलेश यादव हे लोकसभेमध्ये एखाद्याची जात कशी काय विचारली जाऊ शकते? असा सवाल आक्रमकपणे विचारत आहेत. तर दुसऱ्या भागात हेच अखिलेश यादव हे काही पत्रकारांना जात विचारताना दिसत आहेत. ‘तुम्ही तुमचा कॅमेरा दुसरीकडे घेऊन जा. तुम्ही मागास आहात की आणखी कोण? नाव काय आहे तुमचं? यांचं नाव काय आहे, असे मिश्राजी, कुछ तो शर्म करो,  पत्रकारिता करो यार, असं म्हणताना दिसत आहेत. तर याच व्हिडीओमध्ये अखिलेश यादव यांची आणखी एक चित्रफित असून, त्यामध्ये ते आणखी एका पत्रकाराचं नाव विचारताना दिसत आहेत. अरे, नाव काय आहे यांचं? संपूर्ण नाव सांगा, अरे हे तर शुद्र नाहीत, असं बोलून हसताना दिसत आहेत.  

टॅग्स :Monsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनAnurag Thakurअनुराग ठाकुरBJPभाजपाAkhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस