शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

बलात्कारी राम रहीमच्या घरात चोरी, घराची भिंत फोडून चोरांनी दागिने आणि कपडे केले लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2017 2:06 PM

बलात्कारप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमच्या घरी चोरी झाली आहे. बहादूरगढमधील मेंहदीपूर डबोडा परिसरात असणा-या राम रहीमच्या नाम चर्चा घरमध्ये घुसून चोरांनी हात साफ केले.

चंदिगड - बलात्कारप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमच्या घरी चोरी झाली आहे. बहादूरगढमधील मेंहदीपूर डबोडा परिसरात असणा-या राम रहीमच्या नाम चर्चा घरमध्ये घुसून चोरांनी हात साफ केले. चोरांनी घरफोडी करत राम रहीमचे कपडे आणि महागड्या वस्तू चोरल्या आहेत. डबोडा गावात राहणारा राम रहीमचा भक्त जयपालने यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली असून तपास सुरु केला आहे. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी ही चोरी झाली आहे. घराची देखभाल करण्याची जबाबदारी जयपालवर होती. शनिवारी घरामधील पसिरात पोहोचला असता त्याला चोरी झाल्याची माहिती मिळाली. भिंत फोडून चोर घरात घुसले होते. नेमके किती चोर घरात घुसले होते याबाबत काही माहिती मिळालेली नाही. 

कपड्यांची होत असे पूजाजयदीपने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा घरातील परिसरात तो पोहोचला तेव्हा सर्व टाळे तोडण्यात आले असल्याचं त्याच्या लक्षात आलं. ज्या कपड्यांची राम रहीमचे भक्त पूजा करत असतात, ते कपडे घेऊन चोर पसार झाले. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे, हार्ड डिस्क, डीव्हीआर सिस्टम, कॉम्प्युटर्स आणि अन्य महागड्या वस्तू चोरी झाल्या आहेत. डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम आणि इतर व्हीव्हीआयपींसाठी तयार करण्यात आलेल्या रुमममधील सामानावरही चोरांनी डल्ला मारला. 

25 ऑगस्ट रोजी झालेल्या हिंसाचारानंतर डीजीपींनी स्थानिक प्रशासनाला नाम चर्चा घराकडे न जाण्याचा आदेश दिला होता. यानंतर नाम चर्चा घराला टाळं ठोकण्यात आलं होतं. तेव्हापासून ही जागा समर्थकांसाठी बंद करण्यात आली होती. 25 ऑगस्टनंतर या ठिकाणी सत्संग करण्यावरही बंदी घालण्यात आली होती. जयपालला केअरटेकर म्हणून येथे ठेवण्यात आलं होतं. तो नेहमी नाम चर्चा घरमध्ये येत असे आणि साफसफाई करायचा. 

बहादूरगढ पोलिसांनी आम्ही तपास सुरु केला असून, फॉरेन्सिक आणि क्राइम टीम तपास करत असल्याचं सांगितलं आहे. एखाद्यावर संशय असेल तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी असं आवाहनही करण्यात आलं आहे. लवकरच आम्ही चोरीचा उलगडा करु असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Gurmeet Ram Rahimगुरमीत राम रहीमBaba Ram Rahimबाबा राम रहीमMSGमेसेंजर ऑफ गॉडPoliceपोलिसtheftचोरीCrimeगुन्हा