शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भीषण दुर्घटना...! फटाक्यांच्या फॅक्ट्रीत प्रचंड स्फोट १८ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची भीती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 17:49 IST

मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती, आंध्र प्रदेशच्या गृहमंत्री वंगालापुडी अनीता यांनी या घटनेची माहिती देताना व्यक्त केली...

आंध्र प्रदेशच्या काकीनाडा जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. काकीनाडा जिल्ह्यातील वेत्लापलेम गावात असलेल्या एका फटाक्याच्या कारखान्यात शनिवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. दरम्यान, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती, आंध्र प्रदेशच्या गृहमंत्री वंगालापुडी अनीता यांनी या घटनेची माहिती देताना व्यक्त केली.

"स्फोटातील जखमींपैकी अनेकांची प्रकृती अत्यंत गंभीर" -गृहमंत्री अनीता यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आम्हाला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार १८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर सहा जण गंभीररीत्या भाजले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत." तसेच, जिल्हा दंडाधिकारी सगीली शान मोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटातील जखमींपैकी अनेकांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे समजते. अधिकृत माहितीनुसार, स्फोट झाला, तेव्हा कारखान्यात सुमारे २० जण काम करत होते.

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केला शोक, दिले महत्वाचे नर्देश... - दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत ते म्हणाले, "वेत्लापलेम गावातील फटाका कारखान्यात झालेली ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे." त्यांनी तत्काळ जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून बचावकार्याचा आढावा घेतला आणि पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांना घटनास्थळी भेट देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, सरकार प्रभावित कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वासही त्यांनी दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Andhra Pradesh Firecracker Factory Blast: 18 Dead, Many Injured

Web Summary : A massive explosion at an Andhra Pradesh firecracker factory killed 18 and injured many. Chief Minister Naidu expressed grief, ordering immediate relief and investigation. The injured are hospitalized, and the death toll may rise, officials warned.
टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशfire crackerफटाकेBlastस्फोटDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलChandrababu Naiduचंद्राबाबू नायडू