महामार्गावर 2 ट्रकचा भीषण अपघात, दोन्ही गाड्या जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 07:43 AM2021-07-06T07:43:49+5:302021-07-06T07:44:49+5:30

राष्ट्रीय महामार्ग 48 वर भीषण अपघाताची दुर्घटना घडल्याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली.

Horrific accident of 2 trucks on the highway mumbai-ahmedabad, both the vehicles were burnt to ashes | महामार्गावर 2 ट्रकचा भीषण अपघात, दोन्ही गाड्या जळून खाक

महामार्गावर 2 ट्रकचा भीषण अपघात, दोन्ही गाड्या जळून खाक

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्ग 48 वर भीषण अपघाताची दुर्घटना घडल्याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर, संबंधित विभागाने तत्काळ दोन अग्निशमन दलाच्या 2 गाड्यांसह घटनास्थळी धाव घेतली

अहमदाबाद - गुजरातकडे जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वळसद फाट्याजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक बसून भीषण अपघात झाला. अपघातानंतर ट्रकने पेट घेतल्यामुळे आगीत दोन्ही ट्रक जळून खाक झाल्या आहेत. या दुर्घटनेत एका ट्रकमधील चालकाचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती असून मालवाहतूक करणाऱ्या ट्रक होत्या.

राष्ट्रीय महामार्ग 48 वर भीषण अपघाताची दुर्घटना घडल्याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर, संबंधित विभागाने तत्काळ दोन अग्निशमन दलाच्या 2 गाड्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, एका ट्रकमधील ड्रायव्हरचा मृत्यू झाल्याची माहिती फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी दिली. 


दरम्यान, स्थानिकांसह पोलीस प्रशासनानेही घटनास्थळी धाव घेतली आहे. पुढील तपास सुरू आहे. 

Web Title: Horrific accident of 2 trucks on the highway mumbai-ahmedabad, both the vehicles were burnt to ashes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app