"हॅलो, तुमच्या मुलीला संपवलं…"; बंगळुरुत पुण्यातील महिलेची हत्या, सुटकेसमध्ये सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 13:10 IST2025-03-28T07:53:44+5:302025-03-28T13:10:38+5:30

महाराष्ट्रातल्या एका व्यक्तीने बंगळुरुमध्ये पत्नीची हत्या करुन पळ काढल्याची घटना समोर आली आहे.

Horrible murder in Bangalore Husband brutally murdered his wife and hid her body in a suitcase | "हॅलो, तुमच्या मुलीला संपवलं…"; बंगळुरुत पुण्यातील महिलेची हत्या, सुटकेसमध्ये सापडला मृतदेह

"हॅलो, तुमच्या मुलीला संपवलं…"; बंगळुरुत पुण्यातील महिलेची हत्या, सुटकेसमध्ये सापडला मृतदेह

Bangalore Crime: गेल्या काही दिवासांपासून वैवाहिक जीवनातल्या वादातून हत्याकांडाच्या घटना समोर येण्याचे प्रमाण वाढलं आहे. मेरठच्या सौरभ राजपूतची पत्नी मुस्कान रस्तोगी हिने प्रियकरासह मिळून त्याची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर अशीच आणखी काही प्रकरणं समोर आली. आता बंगळुरमध्येही आणखी आणखी एका हत्याकांडाची घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या करुन तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला. पत्नीच्या हत्येनंतर सासरच्या लोकांनाही त्याने फोनवरुन याची माहिती दिल्याचे समोर आलं आहे.

बंगळुरूच्या हुलीमावू भागातून ही खूनाची भयंकर घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातील राकेश खेडकर नावाच्या व्यक्तीने पत्नी गौरी सांबेकर (३२) हिचा खून केला. हत्येनंतर तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरले. यानंतर त्याने पत्नीच्या आई वडिलांना फोन करून पत्नीने आत्महत्या केल्याचे सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता घरात त्यांना एक सुटकेस सापडली. पोलिसांना सुटकेसमध्ये गौरीचा मृतदेह आढळून आला. 

राकेश आणि गौरी यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले असून अवघ्या महिन्याभरापूर्वी दोड्डा कम्मनहल्ली येथे राहत होते. दोघेही एका खाजगी कंपनीत कामाला असून सध्या वर्क फ्रॉम करत होते. गौरी आणि राकेश दोघेही घरून काम करायचे त्यावेळी मात्र त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. हे भांडण इतके वाढले की त्यांच्या शेजाऱ्यांनाही त्याचा त्रास होत होता. दोघांमधल्या भांडणाचा राकेशच्या मनात प्रचंड राग होता. हत्येआधीही दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. वाद इतका वाढला की रागाच्या भरात राकेशने गौरीच्या पोटात वार केले. त्यानंतर गळा चिरून तिची हत्या केली. हत्येनंतर राकेशने गौरीचा मृतदेह एका मोठ्या ट्रॅव्हल सुटकेसमध्ये भरला आणि बाथरूममध्ये टाकून पळ काढला.

त्यानंतर राकेशने स्वत: गौरीच्या आई वडिलांना हत्या केल्याची माहिती दिली. यानंतर त्यांनी महाराष्ट्र पोलिसांना याची माहिती दिली. महाराष्ट्र पोलिसांनी कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधून घटनेबाबत कळवलं.महाराष्ट्र पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. स्थानिक पोलीस अधिकारी सारा फातिमा म्हणाल्या की, "संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास, आम्हाला नियंत्रण कक्षात कॉल आला. हुलीमावू पोलीस घरात पोहोचले तेव्हा त्यांना दरवाजा बंद दिसला. प्रवेश केल्यानंतर त्यांना बाथरूममध्ये एक सुटकेस सापडली. फॉरेन्सिक टीमने सुटकेस उघडली आणि मृतदेह सापडला. महिलेचे शरीर तुकड्यांमध्ये सापडलं नाही. परंतु गंभीर जखमांच्या खुणा आहेत."

राकेशला पुण्यातून अटक

दरम्यान, हत्येनंतर राकेश पुण्याला पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. हुलीमावू आणि पुणे पोलिस यांच्यातील समन्वयाने त्याचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले आणि त्याला अटक करण्यात आली. पुढील चौकशी आणि कायदेशीर कार्यवाहीसाठी संशयिताला परत आणण्यासाठी बेंगळुरूचे एक पथक आता पुण्याला रवाना झाले आहे.

Web Title: Horrible murder in Bangalore Husband brutally murdered his wife and hid her body in a suitcase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.