एकाही घुसखोराला देशात थारा देणार नाही - अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 06:13 PM2019-09-08T18:13:41+5:302019-09-08T18:23:51+5:30

परिषदेत पूर्वेकडील आठ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.  

home minister amit shah says no illegal migrant will be allowed in india; Will not touch Article 371 | एकाही घुसखोराला देशात थारा देणार नाही - अमित शाह

एकाही घुसखोराला देशात थारा देणार नाही - अमित शाह

Next

आसाम : भारतात आता घुसखोरांना स्थान दिले जाणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. गुवाहाटीमध्ये आयोजित पूर्वोत्तर परिषदेच्या 68 व्या सत्रात संबोधित करताना अमित शाह यांनी आसाममधील अवैध नागरिकांवर निशाणा साधला. अमित शाह पूर्वोत्तर परिषदेचे अध्यक्ष आहेत. या परिषदेत पूर्वेकडील आठ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.  

आसाममधील वैध नागरिकांची नॅशनल रजिस्टर फॉर सिटिझनशिपची (एनआरसी) प्रक्रिया ठरल्या वेळेनुसार पूर्ण झाल्याचे अमित शाह यांनी सांगितले. ते म्हणाले, 'एनआरसीवर अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पण, मी स्पष्ट शब्दांत सांगतो की एकाही अवैध नागरिकाला सरकार देशात राहून देणार नाही. हे आमचे वचन आहे.'

 यावेळी अमित शाह यांनी आसामला विशेष दर्जा देणाऱ्या कलम 371 वरही भाष्य केले. कलम 371 ला संविधानात विशेष स्थान आहे आणि भाजपा सरकार त्याचा सन्मान करते. त्यामुळे यामध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत, असे अमित शाह यांनी सांगितले.

(आसाममधील एनआरसीची शेवटची यादी प्रसिद्ध, 19 लाख जण बाहेर )

दरम्यान, वैध नागरिकांची आसाममधील एनआरसीची अंतिम यादी गेल्या महिन्यात जाहीर करण्यात आली आहे . या एनआरसीच्या अंतिम यादीत 3 कोटी 11 लाख 21 हजार नागरिकांना स्थान मिळाले आहे. तर 19 लाख 06 हजार 657 जणांना या यादीमधून बाहेर करण्यात आले आहे. तसेच, एनआरसीच्या अंमित यादीनंतरही ज्यांचे समाधान झाले नसेल, अशा व्यक्ती फॉरिनर ट्रायब्युनलसमोर आपले अपील दाखल करू शकतील, असे सांगण्यात आले आहे.
 

Web Title: home minister amit shah says no illegal migrant will be allowed in india; Will not touch Article 371

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.