गृहमंत्री अमित शाहा रुग्णालयात, प्रकृतीबाबत एम्सच्या डॉक्टरांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 12:37 PM2020-09-13T12:37:47+5:302020-09-13T12:58:23+5:30

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बर्‍याच दिवसांपासून आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत अमित शहा यांना काल रात्री पुन्हा दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.

home minister amit shah hospitalised, aiims doctors gave important information about his health | गृहमंत्री अमित शाहा रुग्णालयात, प्रकृतीबाबत एम्सच्या डॉक्टरांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

गृहमंत्री अमित शाहा रुग्णालयात, प्रकृतीबाबत एम्सच्या डॉक्टरांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Next

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आरोग्याच्या समस्यांचा सामना करत असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना काल रात्री पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अमित शाह यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्यावर उपचार करत असलेल्या एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण वैद्यकीय तपासणीसाठी अमित शाह यांना एक दोन दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बर्‍याच दिवसांपासून आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत अमित शहा यांना काल रात्री पुन्हा दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. गृहमंत्री अमित शहा यांना शनिवारी रात्री ११ वाजता एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.  संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण वैद्यकीय तपासणीसाठी अमित शाह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर एक दोन दिवस उपचार करण्यात येतील, अशी माहिती अमित शाह यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. 



सुत्रांच्या माहितीनुसार, कोरोना संसर्गातून मुक्त झाल्यानंतर अमित शहा यांना श्वास घेताना त्रास जाणवत आहे. अमित शहा यांनी काही काळ रुग्णालयात राहावे. रुग्णालयात त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखी खाली चांगले उपचार होतील, असे एम्समधील एका सूत्राने सांगितले. दरम्यान, अमित शाह यांना एम्समधील कार्डियो न्यूरो टॉवरमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान, याआधी अमित शहा यांना १८ ऑगस्टला नवी दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वातील डॉक्टरांच्या एका पथकाच्या देखरेखीखाली अमित शहा यांच्यावर उपचार सुरु होते. ताप आला होता, त्यामुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.

अमित शहांना झाला होता  कोरोनाचा संसर्ग
अमित शहा यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट २ ऑगस्टला पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल केले होते. अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर सामान्यांपासून ते दिग्गजांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. १२ दिवसानंतर म्हणजेच १४ ऑगस्टला अमित शहा कोरोनामुक्त झाले आणि त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

Web Title: home minister amit shah hospitalised, aiims doctors gave important information about his health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.