शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

Amit Shah : संपूर्ण राज्याच्या मुद्द्यावर शाहंचं मोठं विधान, J&Kच्या परिसीमन आणि निवडणुकीसाठी सरकार वचनबद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 9:41 PM

गृहमंत्र्यांच्या या ट्विटने स्पष्ट झाले आहे, की केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरसंदर्भात पुढे वाटचाल करायला सुरुवात केली आहे. मागे वळण्याचा तर प्रश्नच नाही. म्हणजे...

नवी दिल्ली - केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी गुरुवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर जम्मू-काश्मीरसंदर्भात आपला अजेंडा स्पष्ट केला आहे. भलेही तेथील नेते संपुष्टात आणलेले आर्टिकल 370 पुन्हा बहाल करण्याची मागणी करत असोत, पण सरकारने, ते राज्याच्या संपूर्ण विकासासाठी वचनबद्ध आहेत. तसेच, संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये परिसीमन (सीमा ठरवणे अथवा सीमांकन) आणि निवडणुका आवश्यक आहेत, असे स्पष्ट केले आहे. (HM Amit Shah delimitation and elections of jammu and kashmir necessary for full statehood center is committed)

गृहमंत्री अमित शाह यांचे ट्विट -केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी बैठकीनंतर ट्विट करत म्हटले आहे की, 'जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर आजची बैठक अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. सर्वांनीच लोकशाही आणि संविधानाप्रती आपली वचनबद्धता दर्शवली. तसेच, राज्यात लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यावर भर दिला. 

मागे वळून पाहण्याचा प्रश्नच नाही -गृहमंत्र्यांच्या या ट्विटने स्पष्ट झाले आहे, की केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरसंदर्भात पुढे वाटचाल करायला सुरुवात केली आहे. मागे वळण्याचा तर प्रश्नच नाही. म्हणजे, केंद्र सरकार तेथे सर्वप्रथम परिसीमनाचे कार्य करेल. यामुळे राज्यातील निवडणूक मतदारसंघाची पनर्रचना होईल. यात विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर बदल केले जाऊ शकतात. यानंतर राज्यात विधानसभा निवडणुका घेऊन नव्या विधानसभेची निर्मिती होईल. 

5 ऑगस्त 2019 रोजी कम्मू काश्मीरला लागू असलेल्या अनुच्छेद 370 मधील अनेक तरतुदी नष्ट केल्यानंतर जम्मू-काश्मीरला दिल्ली आणि पुदुचेरी प्रमाणे केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे. या राज्यांच्या आपल्या विधानसभा आहेत. याच पद्धतीने तेथेही विधानसभेची स्थापना होईल. या सर्वपक्षीय बैठकीत आणि त्यानंतर मिडियासोबत बोलताना पीडीपी नेत्या महबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारकडे अनुच्छेद 370 पुन्हा बहाल करण्याची मागणी केली आहे. 

उमर अब्दुल्लांचं वक्तव्य -बैठकीनंतर उमर अब्दुल्ला म्हणाले, आम्ही बैठकीत म्हणालो, की 5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारने अनुच्छेत 370 हटविण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा आम्ही स्वीकार करणार नाही. आम्ही न्यायालयाच्या माध्यमाने 370 च्या मुद्द्यावर आमचा लढा लढू. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाBJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370