हिवरे कुंभार ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अमोल जगताप
By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST
कान्हूर मेसाई : शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अमोल राजाराम जगताप व उपसरपंचपदी राहुल वसंत टाकळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
हिवरे कुंभार ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अमोल जगताप
कान्हूर मेसाई : शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अमोल राजाराम जगताप व उपसरपंचपदी राहुल वसंत टाकळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी सरपंच ललिता जगताप, माजी उपसरपंच शांताराम गायकवाड, माजी सरपंच प्रभाकर मांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा पॅनल उभा केला. पॅनलप्रमुख राहुल टाकळकर, अमोल जगताप व गावातील सर्व तरुणांनी एकत्र येऊन पॅनलची मोर्चेबांधणी केली व ९-० अशी एकहाती सत्ता स्थापन करून सरपंच-उपसरपंचपदाची निवडणूक शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अजित साकोरे, ग्रामसेवक अजित पलांडे यांनी काम पाहिले. बाजीराव जगताप, दामोदर गायकवाड, एकनाथ झेंडे, फक्कड गुंजाळ, शरद तांबे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)छायाचित्र ओळी : हिवरे कुंभार ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदी निवडीनंतर समर्थक कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. -----------------------