शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

कुंभमेळा बनावट कोरोना चाचणीप्रकरणी अनेक ठिकाणी ED चे छापे; धक्कादायक बाबी झाल्या उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2021 9:40 AM

नलवा लॅबोरेट्रीवर ईडीनं टाकला छापा. हिसारच्या नलवा लॅबनं बोगस बिलांद्वारे उत्तराखंड सरकारकडून वसूल केले ३.५ कोटी रुपये.

ठळक मुद्देनलवा लॅबोरेट्रीवर ईडीनं टाकला छापा.हिसारच्या नलवा लॅबनं बोगस बिलांद्वारे उत्तराखंड सरकारकडून वसूल केले ३.५ कोटी रुपये.

उत्तराखंडमद्ये कुंभमेळ्यादरम्यान कोरोना चाचण्यांमध्ये झालेला घोटाळा आता समोर येऊ लागला आहे. हिसारच्या नलवा लॅबोरेट्रीवर शुक्रवारी सक्तवसूली संचलनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांच्या टीमनं छापा टाकला. सकाळी सात वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत सुरू असलेल्या या तपासादरम्यान ईडीनं अनेक कागदपत्रांची पडताळणी केली. हिसार आयएमएच्या डॉ. जेपीएस नलवा आणि त्यांच्या मुलालाही ईडीकडून अनेक प्रश्न विचारण्यात आले. दरम्यान, ईडीनं आता याप्रकरणी मोठे खुलासे केले आहेत. शुक्रवारी ईडीनं दिल्ली पासून देहरादून पर्यंत अनेक खासगी लॅब आणि त्यांच्या संचालकांच्या ठिकाणावर छापे टाकले. 

ईडीकडून मिळालेल्या माहितीनुसार हिसारच्या नलवा लॅबनं बनावट बिलांच्या माध्यमातून उत्तराखंड सरकारला साडेतीन कोटी रूपयांचा चुना लावला. नोवस पॅथ लॅब्स, डीएनए लॅब्स, मॅक्स लॅबोरेट्री प्रायव्हेट लिमिटेड, डॉ. लाल चांदनी प्रायव्हेट लिमिटेड आणि नलवा लॅबच्या कार्यालयांवर आणि देहरादून हरिद्वार, नोएडा, दिल्ली आणि हिसारमध्ये त्यांच्या संचालकांच्या रहिवासी ठिकाणांवर छापे टाकल्याचं ईडीनं सांगितलं. या छाप्यादरम्यान अनेक दस्तऐवज, बनावट बिल, लॅपटॉर आणि संपत्तीचे दस्तऐवज आणि ३०.९ लाख रूपये रोख जप्त केल्याचंही ईडीनं म्हटलं. 

मनीलाँड्रिंग अॅक्ट अंतर्गत कारवाईउत्तराखंड पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसंच या प्रकरणांमध्ये बनावट चाचण्यांच्या आधारे मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याबाबत उत्तराखंड पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. त्यासंदर्भात हरिद्वार येथे झालेल्या कुंभमेळ्यामधील बोगस करोना चाचणी घोटाळ्याच्या चौकशीसाठी हे छापे टाकल्याचं  ईडीनं सांगितलं. आतापर्यंत झालेल्या तपासातून वरील सर्व लॅबना कुंभ मेळा २०२१ च्या पार्श्वभूमीर उत्तराखंड सरकारकडून कोरोनाच्या रॅपिड अँटिजेन चाचणी आणि आरटीपीसीआर चाचण्या करण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं. यांनी कदाचितच कोविडच्या चाचण्या केल्या असतील आणि तपासासाठी बनावट एन्ट्री करण्यात आल्या, तसंच आर्थिक लाभ मिळवण्यासाठी बनावट बिलंही तयार केल्याचं यावेळी सांगण्यात आलं. 

बनावट माहितीईडीनं दिलेल्या माहितीनुसार लॅबना उत्तराखंड सरकारनं ३.४ कोटी रूपयांची रक्कम आंशिक रक्कम म्हणून यापूर्वीच दिली होती. तसंच या प्रयोगशाळांमध्ये वापरली जाणारी कार्यप्रणाली ही होती की त्यांनी कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढलेली दाखवण्यासाठी एकच मोबाईल क्रमांक किंवा बनावट मोबाईल क्रमांक, एकच पत्ता अथवा एकच रेफरल फॉर्मचा वापर केला होता. या लॅब्सच्या बनावट नकारात्मक चाचण्यांमुळे त्यावेळी हरिद्वारमध्ये संसर्गाचा दर खऱ्या अर्थानं ५.३ टक्क्यांच्या तुलनेत ०.१८ टक्के होता, असंही ईडीनं नमूद केलं.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय