HI हर्षा, माझ्याशी लग्न करशील?; असलमच्या प्रपोजलला कुंभमधील व्हायरल गर्लचं बेधडक उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 13:36 IST2025-05-05T13:35:10+5:302025-05-05T13:36:04+5:30
हर्षाने हा ईमेल सार्वजनिक करत त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर स्क्रिनशॉट शेअर केला आहे.

HI हर्षा, माझ्याशी लग्न करशील?; असलमच्या प्रपोजलला कुंभमधील व्हायरल गर्लचं बेधडक उत्तर
नवी दिल्ली - प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात तिच्या सौंदर्याने अनेकांना भुरळ घातलेली सोशल मीडियावरील व्हायरल गर्ल हर्षा रिछारिया पुन्हा चर्चेत आली आहे. यावेळी तिला एका अजब गजब लग्नाच्या प्रपोजलचा प्रस्ताव ईमेलद्वारे मिळाला आहे. भोपाळमधील हर्षाला असलम पठाण नावाच्या युवकाने मेल पाठवला असून त्यात थेट हाय हर्षा, माझ्या लग्न करशील का, मला तुझ्याशी लग्न करायचंय, तु बोलली तर भोपाळला येईन असं म्हटलं आहे.
हर्षाने हा ईमेल सार्वजनिक करत त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर स्क्रिनशॉट शेअर केला आहे. त्यात म्हटलंय की, सर्वात आधी या व्यक्तीच्या हिंमतीची दाद द्यायला हवी त्याने हा ईमेल पाठवला, तोही मला...दुसरी गोष्ट, तुम्हाला काय वाटते हिंदू शेर सोडून मला सुअर पसंद येतील? तिसरी गोष्ट, जर मी आज हिंदू आहे याचा अर्थ माझ्या आजोबा पंजोबांनी धर्म परिवर्तनाची लढाई लढली असेल आणि धर्म परिवर्तनाविरोधात मी आज उभी आहे. चौथी बाब, तुम्ही तुमच्या सख्ख्या आई, बहिणीचे नाही झालात मग दुसऱ्याचे काय होणार, हर हर महादेव असं तिने म्हटलं आहे. हर्षाने या प्रकरणी अद्याप तक्रार नोंदवली नाही.
या व्हिडिओनंतर हर्षाने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात मला अपेक्षा आहे आतापर्यंत भाईचाराचा धडा मिळाला असेल, सेक्युलिजमचा किडा डोक्यातून निघायला सुरुवात झाली असेल. आताही सुधारला नाही तर पुन्हा घर जाळा...असं तिने म्हटलं. हर्षा रिछारिया महाकुंभ मेळ्यात चर्चेत आली होती. निरंजन आखाड्याशी निगडीत हर्षा तिच्या बेधडक स्वभावाने व्हायरल झाली होती. हर्षा रिछारिया झाशीही रहिवासी आहे परंतु ती सध्या भोपाळला राहते.
अलीकडेच हर्षा रिछारियाने संभळ वादावर भाष्य केल्याने चर्चेत होती. मला वाटलं की, मला संभळला जायला हवं आणि शहरातील सनातनी बंधू आणि भगिनींना भेटायला हवं. वेद, पुराण आणि शास्त्रांमध्ये संभळबद्दल लिहिलं आहे की, कलियुगाच्या शेवटी भगवान कल्की पवित्र नगरी संभळमध्ये अवतार घेतील. अशा नगरीला जाणून घेणं प्रत्येक सनातनीचं कर्तव्य आहे. मी एक हिंदू व्यक्ती आहे" असं तिने म्हटलं होते.