"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 16:36 IST2025-06-15T16:34:33+5:302025-06-15T16:36:47+5:30

गुरुवारी दुपारी अहमदाबाद येथे झालेल्या या विमान अपघातात गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांसह विमानात असलेल्या २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला.

"He's not eating anything, he's numb"; The boy who filmed the Ahmedabad plane crash incident is shocked! | "तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!

"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!

गुजरातमधीलअहमदाबाद येथे गुरुवारी दुपारी घडलेल्या भीषण विमान अपघाताने अनेकांच्या मनात धडकी भरवली आहे. या दुर्घटनेचा व्हिडिओ चित्रित करणारा १७ वर्षीय आर्यन मात्र या घटनेमुळे इतका हादरला आहे की, त्याला भविष्यात कधीही विमानात बसण्याची हिंमत होणार नाही, असे तो म्हणतो.

काय घडलं त्या गुरुवारी?
अहमदाबादचा रहिवासी असलेला आर्यन याला विमानांचे व्हिडीओ बनवण्याची आवड आहे. दररोजप्रमाणे गुरुवारी दुपारी तो व्हिडीओ बनवत असताना, त्याला एक विमान खूप खालून उडताना दिसले. सुरुवातीला त्याला वाटले की, हे विमान धावपट्टीवर उतरणार आहे. मात्र, काही क्षणातच झालेल्या प्रचंड स्फोटाने आणि त्यानंतर आगीचे व धुराचे लोट पाहून आर्यन पूर्णपणे सुन्न झाला. हा थरारक आणि हृदयद्रावक क्षण त्याने आपल्या कॅमेरात कैद केला आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

आर्यनवर अपघाताचा मानसिक परिणाम
या अपघातानंतर आर्यनला मोठा मानसिक धक्का बसला आहे. शनिवारी माध्यमांशी बोलताना त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. "मला नेहमीच एकदा तरी विमानात बसायचे होते, पण या अपघातानंतर मी हिंमतच करू शकत नाही. मला वाटते की यामुळे मी आयुष्यभर विमानात चढूच शकणार नाही," असे आर्यनने सांगितले.

आर्यनच्या बहिणीनेही त्याच्या या अस्वस्थतेबद्दल सांगितले. ती म्हणाली, "अपघातानंतर माझा भाऊ खूप अस्वस्थ आहे. त्याने मला व्हिडिओ दाखवला आणि म्हणाला की त्याला इथे राहायचे नाही, कारण हे ठिकाण खूप धोकादायक आहे. तो खूप घाबरलेला आहे आणि त्या दिवशी तो नीट बोलूही शकत नव्हता." आर्यनच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या महिलेनेही याला दुजोरा दिला. "घटनेनंतर मी त्याला पाहिले, तेव्हा तो बोलू शकत नव्हता. मी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो रात्रभर जागा राहिला. तो शांत झाला आहे, पण अजूनही काहीही खात नाहीये," असे त्या म्हणाल्या.

अपघाताची भीषणता
गुरुवारी दुपारी २ वाजता अहमदाबाद येथे झालेल्या या विमान अपघातात गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांसह विमानात असलेल्या २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. याव्यतिरिक्त, विमान ज्या ठिकाणी कोसळले, त्या ठिकाणीही अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. सरकारी आकडेवारीनुसार, या अपघातात आतापर्यंत २७५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या दुर्घटनेने आर्यनसारख्या अनेक निष्पाप लोकांच्या मनावर खोलवर परिणाम केला आहे.

Web Title: "He's not eating anything, he's numb"; The boy who filmed the Ahmedabad plane crash incident is shocked!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.