शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

आईच्या दुसऱ्या विवाहाप्रसंगी मुलाने लिहिले भावूक पत्र, सोशल मीडियावर झाले व्हायरल  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 5:52 PM

केरळमधील तरुणाने आपल्या आईसाठी सोशल मीडियावर लिहिलेली एक पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

तिरुवनंतपुरम - केरळमधील गोकुल श्रीधर नामक तरुणाने आपल्या आईसाठी सोशल मीडियावर लिहिलेली एक पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. गोकुळने आपल्या आईच्या दुसऱ्या विवाहानिमित्त तिला शुभेच्छा देताना ही भावूक पोस्ट लिहिली आहे. माझ्या आईने तिच्या पहिल्या विवाहामध्ये अनेक हालअपेष्टा भोगल्या. तिला शारीरिक हिंसेचा सामना करावा लागला. मात्र माझ्या पालनपोषणासाठी तिने हे सर्व काही सहन केले. आता तिचा दुसरा विवाह होऊन नव्याने संसार सुरू होत आहे, याचा मला आनंदच आहे, असे या तरुणाने मल्याळम भाषेतून लिहिलेल्या आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.  गोकुल आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, ''एक अशी स्री जिने आपले संपूर्ण जीवन माझ्यासाठी कुर्बान केले. एका वाईट संसारामध्ये खूप काही सहन केले. अनेकवेळा मी तिला शारीरिक हिंसाचाराची शिकार होताना पाहिले. तिच्या डोक्यावरून रक्ताचे ओघळ येताना पाहिलेत. हे सर्व का सहन करतेस? असं मी तिला अनेकवेळा विचारले. पण मी तुझ्यासाठी सारे काही सहन करू शकते, असे तिचे उत्तर असायचे. तिने आपले संपूर्ण तारुण्य माझ्यावर ओवाळून टाकले.  आता तिची स्वत:साठीची खूप काही स्वप्न आहेत. मला वाटते हे असे काही आहे जे मला कुणापासून लपवण्याची गरज नाही. आई, तुझे नवे वैवाहिक जीवन आनंदी राहो.'' 

ही पोस्ट शेअर करताना आपल्याला खूप संकोच वाटत होता, असेही गोकुल सांगतो. ''या पोस्टमधून व्यक्त केलेल्या विचारांकडे समाजातील एका वर्गाकडून योग्य दृष्टीकोनातून पाहिले जाणार नाही, असे मला वाटत होते. मात्र आपल्याला काहीही लपवण्याची गरज नाही याची जाणीव मला झाली. त्यानंतर मी माझा आनंद शेअर करण्याच निर्णय घेतला.'' गोकुलची ही पोस्ट काही वेळातच सुमारे २९ हजार जणांनी शेअर केली. त्यापैकी अनेकांनी त्याच्या विचारांवर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. गोकुलने या पोस्टसोबत आपली आई आणि तिच्या दुसऱ्या पतीचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे.    

टॅग्स :FamilyपरिवारKeralaकेरळSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल